शिवप्रहार न्यूज - श्रीरामपुरात गोवा एक्सप्रेस खाली एकाचे तुकडे तुकडे! बेलापूर ची मुलगी निळवंडे परिसरात बुडाली!!
श्रीरामपुरात गोवा एक्सप्रेस खाली एकाचे तुकडे तुकडे! बेलापूर ची मुलगी निळवंडे परिसरात बुडाली!!
श्रीरामपूर/संगमनेर (शिवप्रहार न्यूज)- श्रीरामपूर शहरात रेल्वे मेल क्रमांक 414-36 ते 414-34 या दरम्यान रेल्वे रुळावर भरधाव वेगातील गोवा एक्सप्रेस या रेल्वे गाडीच्या खाली सापडून एका पुरुषाचे तुकडे तुकडे झाले. मयत हा अनोळखी असून याप्रकरणी शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोना.अहिरे हे पुढील तपास करीत आहे.
दरम्यान श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर परिसरात राहणाऱ्या साळुंखे कुटुंबातील लहान मुलगी मधुमाला श्याम साळुंखे हीचा संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथील जलजीवन मिशन अंतर्गत पाईपलाईन खोदकाम सुरू असून खोदकामात चारीत साठलेल्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. तिला तात्काळ घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच लहान मुलगी मयत झाल्याची खबर संगमनेर तालुका पोलिसांत दिली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. साळुंके कुटुंब सध्या निळवंडे परिसरात राहतात. या प्रकरणी पोलीस निरीक्षक ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली सफौ.औटी हे पुढील तपास करीत आहे. लहान मुलीच्या दुर्दैवी मृत्यूमुळे हळळ व्यक्त होत आहे.