शिवप्रहार न्यूज-श्रीरामपुरात अंडरग्राउंड पुलाखाली मोटर कार बुडाली...
श्रीरामपुरात अंडरग्राउंड पुलाखाली मोटर कार बुडाली...
श्रीरामपूर -श्रीरामपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ असणाऱ्या रेल्वे अंडरग्राऊंड पुला खाली मुसळधार पाऊस पडत असल्याने मोठे पाणी साचले होते.त्यामुळे गोंधवणी कडे जाणाऱ्या रस्त्यावर तसेच गोंधवणी कडुन येणाऱ्या रस्त्यावर पूर्ण पाण्याचे तळे साचले होते.
त्यावेळी एका काळपट रंगाच्या मोटारकार चालकाने या पाण्यामध्ये मोटार कार घालून त्यातून वाट काढत बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. परंतु चार ते पाच फूट पाणी साचलेले असल्यामुळे या मोटर कार चालकाची कार त्या ठिकाणी अर्धवट बुडून अडकून पडली.त्यानंतर तेथे काही तरुण आले आणि त्यांच्या मदतीने ही मोटर कार गोंधवणी रोडच्या दिशेने वरती ढकलत बाहेर काढण्यात आली.
श्रीरामपूर शहरात सायंकाळी साडेचार वाजल्यापासून मुसळधार पाऊस पडत आहे.त्यामुळे रेल्वे अंडरग्राउंड पुलाखाली साचलेल्या पाण्यामुळे येण्याजाण्याचा रस्ता वाहतुकीस बंद झाला आहे.
दरम्यान एक मोठा ट्रक देखील या अंडरग्राउंड पुला खाली साचलेल्या पाण्यात अडकल्याची माहिती देखील समोर येत आहे.