शिवप्रहार न्यूज- श्रीरामपुरात चिकन टिक्क्यावाल्याने दिला मेलेल्या कोंबडीचा सडलेला चिकन टिक्का...

शिवप्रहार न्यूज- श्रीरामपुरात चिकन टिक्क्यावाल्याने दिला मेलेल्या कोंबडीचा सडलेला चिकन टिक्का...

श्रीरामपुरात चिकन टिक्क्यावाल्याने दिला मेलेल्या कोंबडीचा सडलेला चिकन टिक्का...

श्रीरामपूर - श्रीरामपूर शहरातील संगमनेर रोड वर असणाऱ्या महाराष्ट्र चिकन & स्पेशल तंदुरी हाऊस या चिकन टिक्का वाल्याने मेलेल्या कोंबडीच्या मांसाचा चिकन टिक्का गिर्‍हाईकांना दिल्याची घटना घडली आहे.

       अधिक माहिती अशी की,बेलापूर परिसरातील श्री.दौलत गायकवाड हे त्यांच्या मित्रपरिवारासह महाराष्ट्र चिकन & स्पेशल तंदुरी हाऊस येथे चिकन टिक्का खाण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या निदर्शनास आले की,येथील चिकन टिक्का बणवणारा हा मेलेल्या कोंबडीचे सडलेले,काळे पडलेले मांस चिकन टिक्का बनवण्यासाठी वापरत आहे.

       त्यामुळे त्यांनी या गोष्टीला आक्षेप घेतला आणि सडलेले व काळे पडलेले चिकन का वापरता? असा सवाल या दुकानदाराला केला. त्यावेळी हा दुकानदार माझी चूक झाली असे म्हणू लागला व त्याबाबत कोणाला काही सांगू नका मी तुम्हाला दोन हजार रुपये देतो असे हा दुकानदार दौलत व त्यांच्या मित्रांना बोलला.

       या प्रकारामुळे संतप्त झालेल्या दौलत गायकवाड व त्यांचे मित्र शरद बोंबले,किरण गुंजाळ,अशोक गुलदगड,स्वप्निल गायकवाड, सचिन नवले ,शुभम शेळके ,तुषार मोहिते यांनी या दुकानदारावर अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई करावी अशी मागणी केली आहे. 

         तसेच त्याचे दुकान देखील पोलिसांनी सील करावे जेणे करून या चिकन टिक्का वाल्याचा नागरिकांच्या जीवाशी चाललेला हा खेळ बंद होईल अशी देखील मागणी त्यांनी केली आहे.