शिवप्रहार न्यूज- साई'नामाच्या गजरात शिर्डीत पार पडली परिक्रमा…
'साई'नामाच्या गजरात शिर्डीत पार पडली परिक्रमा…
शिर्डी प्रतिनिधी :
श्री साईबाबांच्या जीवनावर आधारित शालेय विद्यार्थ्यांचे कलापथके, दोन प्रकारचे गणवेश धारण केलेल्या विविध शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी, हार फुलांनी सजवलेला साईरथ रथापुढे टाळ मृदुंग व भजने यांचा निनाद, त्याचप्रमाणे संगीताच्या तालावर साईनामाचा गजर, राज्यातून, परराज्यातून, विदेशातून आलेले व विविध पेहराव करून साईचा जय जयकार करत मोठ्या भक्तिमय वातावरणात सामील झालेले साईभक्त, फेटे बांधलेल्या हजारो महिला, शालेय विद्यार्थी, अशा असंख्य लहान थोरांपासून सर्वच तन मनाने तल्लीन होत सामील होऊन शिर्डीची ही महापरिक्रमा एक रेकॉर्डब्रेक अशी ठरली गेली आज रविवार 13 मार्च 2022 रोजी सकाळी 6 वाजे दरम्यान श्री साईबाबांच्या स्थाचे श्री खंडोबा मंदिरात ह.भ.प. रामगिरी महाराज, मंहत काशीकानंद महाराज, ह भ प उद्धव महाराज मंडलिक, यांच्या हस्ते पूजन करून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा व शालिनीताई विखे, श्री साई संस्थानचे विश्वस्त डॉ.एकनाथराव गोंदकर, सचिन गुजर, अविनाश दंडवते, सुहास आहेर, आदी विश्वस्त तसेच नगर शिर्डी परिषदेचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे आदी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत व साई नामाच्या गजरात पुष्पगुच्छ यांच्या वर्षावात सुरुवात झाली.
श्री खंडोबा मंदिरापासून नगर-मनमाड महामार्गाने ही परिक्रमा व हजारो साईभक्त पायी पोलीस स्टेशन पर्यंत येऊन रुई शिव रस्त्याने पुढे पुढे जात होती. रस्त्यामध्ये या सर्व परिक्रमेत सहभागी झालेल्या साईभक्तांचे स्वागत करण्यासाठी जागोजागी स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या तसेच ठिकठिकाणी साईभक्तांना थंड पाणी, सरबत, ताक, लस्सी, चहा, बिस्किटे, केळी, चॉकलेट तसेच नाश्त्याची सोय करण्यात आली होती. या परिक्रमेत बाहेरून आलेल्या अनेक साईभक्तांनी आपल्या राज्यातील गणवेश परिधान केलेला दिसून आला. अनेकांनी साईबाबांची चित्रे असलेली टी शर्ट घातलेली होते. अनेक जण परिक्रमा करताना दिसले. परिक्रमेत ठिकठिकाणी साईभक्तांचे जोरदार स्वागत होत होते. परिक्रमा मार्गाच्या दुतर्फा असणाऱ्या रहिवाशांनी , शेतकऱ्यांनी महिलांनी आपल्या घरासमोर रांगोळ्या काढल्या होत्या. तसेच रस्त्याच्या दुतर्फा व रस्त्यावरही सर्वत्र रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. रस्त्यावर गुलाब पाकळ्या टाकून स्थापुढे सुशोभीकरण करण्यात आले होते. डीजे, बँड, अशी सवाद्य रथ मिरवणूकी बरोबरच ही परिक्रमा साई नामाच्या जयघोषात पुढे पुढे जात होती. हजारोच्या संख्येने साईभक्त या परिक्रमेत उपस्थित होते. श्री साईबाबांच्या सर्वधर्म समभावाची शिकवण या महापराक्रमेतुन दिसून आली. सर्व जातीधर्मातील, गरीब-श्रीमंत असा कोणताही भेदभाव न करता सर्व साईच्या भक्तिरसात बुडून गेले होते. ही साई परिक्रमा शिर्डी रुई शिव रस्त्याने कमलाकर कोते यांच्या वस्ती जवळून पुढे श्री बिरोबा मंदिराकडे गेली. तेथेही व विविध ठिकाणी महिलांनी श्री साई स्थाचे पूजन केले. रस्त्याच्या दुतर्फा अनेक ठिकाणी महिलांनी दिवे लावले होते. या परिक्रमेत कुणीही आयोजक संयोजक नसताना प्रत्येक जण स्वतःच आयोजक बनुन मदत करण्याचा प्रयत्न करत होता. ही महा परिक्रमा सुव्यवस्थित कशी होईल. यासाठी सर्वांची धडपड दिसून येत होती.
या महापरिक्रमेत महाराष्ट्र पोलीस बॉईज या संघटनेचे सुमारे 44 मुले व 15 मुली आपला गणवेश परिधान करून बंदोबस्तासाठी तैनात होते अहमदनगर जिल्हा अध्यक्ष सुदर्शन गोंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली ते या परिक्रमेत मोठी मदत करताना दिसले. त्याचप्रमाणे शिर्डी पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गुलाबराव पाटील व त्यांचे सुमारे 40 ते 50 पोलिस कर्मचारी यांनी ठिकठिकाणी बंदोबस्त ठेवून ही महापरिक्रमा सुरळीत पार पाडण्यासाठी मोठे परिश्रम घेतले. या महापरिक्रमेतील पदयात्री, साईभक्त मोठ्या उत्साहात 14 किलोमीटर परिक्रमेसाठी साईनामाचा जयघोष करीत पुढे पुढे जात होते. हा क्षण हा परिक्रमेचा सोहळा न भूतो न भविष्यती असा डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला. या सोहळ्यात श्री साईबाबांची भव्यदिव्य १० फुटी मूर्तीची मिरवणूक, शिर्डी नगरपरिषदेची हातात फलक घेऊन वृक्षदिंडी, शिर्डीतील साई निर्माण स्कूल, संजीवनी इंटरनॅशनल स्कूल, आत्मा मलिक स्कूल, गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल, सिल्वर ओक स्कूल, आदी शिर्डी व परिसरातील शाळांनी साईबाबांच्या जीवनावर आधारित विद्यार्थ्यांनी बनवलेले झाकिया तसेच बाहेरील ठिकाणाहून आलेल्या साईभक्तांनी हातात धरलेल्या रंगीबिरंगी छत्र्या, आकर्षित सजवलेली जीप, अनेकांचे पांढरे ड्रेस, टोप्या, वेशभूषा केलेले भालदार चोपदार, व यांच्या मधोमध असणाऱ्या साई पालखीने सर्वांसाठी एक आकर्षित असे वातावरण व भक्तीमय स्वरूप निर्माण केले होते. अनेक ठिकाणी साई भक्तांना थकल्यानंतर व वयस्कर साई भक्तांच्या सेवेसाठी बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. त्याच प्रमाणे परिक्रमेत चालत असताना काही अडचण आली तर रुग्णवाहिकेची व्यवस्था होती. वैद्यकीय पथके संस्थांनचे महापराक्रमेत सेवेसाठी उपलब्ध होते. या परिक्रमेत सर्व मान्यवर, साईभक्त, ग्रामस्थ विद्यार्थी व परिसरातील नागरिक, राज्यातील परराज्यातील विदेशातील, साईभक्त या सर्वांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. साई परिक्रमा श्री साई कृपेने रेकॉर्डब्रेक अशी झाली. साई परिक्रमा बिरोबा मंदिरा पासून एस. व्ही. आर. पेट्रोल पंप तेथून नगर मनमाड रस्ता क्रॉस करुन शिव रस्त्याने पुढे जाऊन विमानतळ रस्त्याने द्वारावती व तेथून श्री साई मंदिर प्रवेशद्वार दोन अशी मंदिर परिसरात आली. सर्व साई भक्तांनी दुपारची श्री साईंची मध्यान आरती यावेळी तेथे केली व यामहापरिक्रमेची आरतीनंतर उत्साहात सांगता झाली ही महापरिक्रमा एक अनोखी, अद्भुत ऊर्जा निर्माण करणारी, भक्ती शक्तीचा संगम दर्शवणारी साईभक्तच नव्हे तर संपूर्ण जगाला, विश्वाला आकर्षित करणारी अशी ठरली गेली. हजारो साई भक्तांनी या महापरिक्रमेत सहभाग घेऊन आनंद घेतला. त्याच प्रमाणे ही महापरिक्रमा सोशल मीडिया, टीव्ही, विविध वृत्त व चैनल द्वारे घरी बसूनपहात या आनंदात अनेक जण सामील झाले अशा या शिर्डी तीर्थयात्रा महापरिक्रमेची नोंद, शिर्डीत नव्हे तर संपूर्ण राज्यात देशात घेतली जाईल अशी अद्भुत व विशाल अशी ही महा परिक्रमा ठरली गेली. यावेळी साईसंस्थानचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे, जिल्हा परिषदेच्या मा.अध्यक्षा शालीनीताई विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, साईसंस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत, नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, जेष्ठ नेते कैलासबापू कोते, मा.नगराध्यक्षा अर्चनाताई कोते, विश्वस्त महेंद्र शेळके, सुरेश वाबळे, सचिन गुजर, अविनाश दंडवते, संजीवनी उद्योग समुहाच्या संचालीका मनाली कोल्हे आदीसह शिर्डी शहरातील सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.यावेळी शिर्डी युवा ग्रामस्थ, द्वारकामाई मित्र मंडळ, सन्मित्र मंडळ, छत्रपती शासन, क्रांती युवक मंडळ, शिवनेरी मित्र मंडळ, यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक असे सुमारे दहा हजारांहून जास्त भाविक उपस्थित होते.