शिवप्रहार न्यूज- श्रीरामपुरात गाडी चोर आरोपींसह १० दुचाकी व ०१ टेम्पो पोलिसांनी पकडला...
श्रीरामपुरात गाडी चोर आरोपींसह १० दुचाकी व ०१ टेम्पो पोलिसांनी पकडला...
श्रीरामपूर - श्रीरामपूर शहरामध्ये मोटरसायकल चोरणाऱ्या टोळीला श्रीरामपूर पोलिसांनी जेरबंद केले आहे.याबाबत अधिक माहिती अशी की,आरोपी योगेश हिवाळे, राहणार -पडेगाव ,तालुका श्रीरामपूर हा चोरीची मोटर सायकल विक्री करण्यासाठी श्रीरामपूर शहरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून आरोपी हिवाळे याला ताब्यात घेतले.
त्याच्याकडून 10 मोटर सायकल सह एक टाटा जीप टेम्पो जप्त करण्यात आले आहे.आरोपीला या गुन्ह्यात सचिन शिंदे ,जावेद सय्यद ,रामनाथ गायकवाड या त्याच्या साथीदारांनी मदत केल्याची माहिती आरोपीने पोलिसांना सांगितली.
श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.