शिवप्रहार न्यूज- तरुणीचा विनयभंग करणाऱ्या श्रीरामपूर तालुक्यातील त्या डॉक्टरने नेत्यासोबत लाखोंची मांडवली करून प्रकरण मिटवले…
तरुणीचा विनयभंग करणाऱ्या श्रीरामपूर तालुक्यातील त्या डॉक्टरने नेत्यासोबत लाखोंची मांडवली करून प्रकरण मिटवले…
श्रीरामपूर - श्रीरामपूर तालुक्यातील रेल्वे स्टेशन असणार्या प्रवराकाठच्या एका गावात डॉक्टरी व्यवसाय करणार्या एका डॉक्टरने परवा दिवशी सायंकाळी ०६:३० वा एका कॉलेजात जाणाऱ्या तरुणीचा उपचाराच्या नावाखाली अतिशय हीन प्रकारे विनयभंग केला होता.सदर बाब या कॉलेजात जाणाऱ्या तरुणीच्या घरच्यांना समजल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी या डॉक्टरला बेदम मारहाण केली होती.
तसेच हिंमत दाखवून त्याच्याविरोधात पोलिसात तक्रार देण्याची तयारी नातेवाईक करत होते. परंतु गावच्या एका “प्रमुख” लोकल पुढाऱ्याने दबाव टाकुन काल रोजी लाखोंची मांडवली करून या डॉक्टर विरोधात तक्रार पोलीस ठाण्यात येऊ दिली नाही. तसेच एव्हढा गंभीर गुन्हा करुन देखील डॅाक्टरने बिनलाजेपणाने आज दवाखाना पुन्हा चालु देखील केला आहे.
या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत असून या डॉक्टरने यापूर्वी देखील असेच महिलांसोबत गैरवर्तन केले असल्याचे समजते.जर या डॉक्टरवर पोलिसात तक्रार नोंदवून कायदेशीर कारवाई झाली नाही तर हा डॉक्टर अशाच प्रकारे नीच कृत्य करत राहील.
म्हणून पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी सुजाण ग्रामस्थ करीत आहेत.नाहीतर या एका डॅाक्टरमुळे या गावातील महिलांना असुरक्षित वातावरणात राहावे लागेल व एकामुळे सगळेच डॅाक्टर बदनाम होतील.