शिवप्रहार न्यूज - श्रीरामपूर कोर्टात पठाण पिक्चर विरोधात दावा दाखल…

शिवप्रहार न्यूज - श्रीरामपूर कोर्टात पठाण पिक्चर विरोधात दावा दाखल…

श्रीरामपूर कोर्टात पठाण पिक्चर विरोधात दावा दाखल…

श्रीरामपूर(शिवप्रहार न्युज)-श्रीरामपूर कोर्टात 'पठाण' चित्रपटाचे नुकतेच युट्युबवर अपलोड करून जाहिरात केलेले टिझर व बेशरम रंग गाणे या विरोधात दावा दाखल करण्यात आला आहे.

     याबाबत अधिक माहिती अशी की, शाहरुख खान, दीपिका पादुकोण यांची मुख्य भूमिका असलेल्या यशराज फिल्मस् च्या पठाण चित्रपटाचे युट्युब वर 'टीझर' व 'बेशरम रंग' हे गाणे अपलोड करून जाहिरात केलेली आहे. एखाद्या चित्रपटचे टीचर गाणे युट्युब वर अपलोड करून जाहिरात करताना चित्रपटाला सेंन्सॉर बोर्डाकडून मिळालेले 'यु ए सर्टिफिकेट' सदर जाहिरातीमध्ये दर्शविणे आवश्यक असते.परंतु पठाण चित्रपटाचे 'टिझर' व 'बेशरम रंग' हे गाणे युट्युबवर अपलोड करून जाहिरात करताना सेंसर बोर्डाचे यु ए सर्टिफिकेट दर्शविलेले नाही.

    पठाण चित्रपटाचे यशराज फिल्मस् यांनी युट्युब व इतर कोणत्याही सोशल मीडियावर पठाण चित्रपटाचे कोणतेही टिझर, ट्रेलर, गाणे, दृश्य, जाहिराती, होल्डिंग, पोस्टर या यु ए सर्टिफिकेट दर्शविल्याशिवाय प्रसिद्ध करू नये यासाठी सदरचा निरंतर ताकीद मनाई हुकुम करिता दावा श्रीरामपूर येथील सुरेश भगवान पाटील यांनी दाखल केला आहे. 

    सदरच्या प्रकरणामध्ये कोर्टाने यशराज प्रोडक्शन यांना कारणे दाखवा नोटीस पाठविली आहे. न्यायालयात पाटील यांच्या वतीने ॲड.तुषार.के.चौदंते, ॲड.सौरभ गदिया, ॲड.भूषण वैराळ हे काम पाहत आहेत.