शिवप्रहार न्यूज- नेवाशात गोमांस घेऊन जाणाऱ्यांकडून पोलिसाला मारहाण;पोलिसांची गाडी जाळून टाकण्याची धमकी.

शिवप्रहार न्यूज- नेवाशात गोमांस घेऊन जाणाऱ्यांकडून पोलिसाला मारहाण;पोलिसांची गाडी जाळून टाकण्याची धमकी.

नेवाशात गोमांस घेऊन जाणाऱ्यांकडून पोलिसाला मारहाण;पोलिसांची गाडी जाळून टाकण्याची धमकी...


नेवासा/प्रतिनिधी -
नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथे काल दुपारच्या सुमारास पोलीस कॉन्स्टेबल श्री.श्याम गुंजाळ हे त्यांचे नियमित कर्तव्य करत असताना त्यांना आरोपी ०१)रेहान यासीन शेख,०२)यासीन गणी शेख, ०३)रियाज गणी शेख,०४)रिहान यासीन शेख, सर्व राहणार-सलाबतपुर,तालुका नेवासा हे गोमांस घेऊन जात असताना मिळून आले.
        त्यावेळी पोलीस शिपाई गुंजाळ हे गोमांस संदर्भातील कायदेशीर कारवाई करीत असताना आरोपी रियाज शेख ,रिहान  शेख यांनी “पोलिसांची गाडी जाळून टाका म्हणजे पोलीस आपल्याला पकडण्यासाठी पुन्हा येथे यायची हिंमत करणार नाही” असे बोलून आरडाओरडा केला. आरोपींनी गुंजाळ यांना शिवीगाळ केली तसेच आरोपी यासीन शेख याने पोलीस शिपाई श्री.गुंजाळ यांना कवळी घालून पकडून त्यांचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला तर आरोपी रेहान शेख याने गुंजाळ यांचा शर्ट फाडून,त्यांचा शर्ट ओढून,गचांडी पकडून त्यांना मारहाण केली.
          या सर्व घटनेमुळे सलाबतपुर आणि नेवासा तालुक्यात मोठी खळबळ माजली आहे. बेकायदेशीर गोमांस विक्री करणाऱ्या आरोपींची आता थेट पोलिसांना मारहाण करून आपला धंदा राजरोसपणे चालू ठेवण्यापर्यंत मजल गेलेली आहे. असे या घटनेतून दिसत आहे. 
         या घटनेनेचा सर्व नेवासा तालुक्यात तीव्र निषेध होत आहे.या प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई श्री.गुंजाळ यांच्या तक्रारीवरून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून यावेळी 200 किलो चे गोमांस देखील जप्त करण्यात आले आहे.
          तसेच पोलिसांनी तपासाची सूत्रे तात्काळ हलवून यातील आरोपी रेहान शेख व यासीन शेख यांना अटक केली आहे.पुढील तपास नेवासा पोलिस करीत आहेत.