शिवप्रहार न्यूज -मोदी सरकारच्या ०७ व्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपचा स्तुत्य उपक्रम...

शिवप्रहार न्यूज -मोदी सरकारच्या ०७ व्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपचा स्तुत्य उपक्रम...

मोदी सरकारच्या ०७ व्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपचा स्तुत्य उपक्रम...

श्रीरामपूर-भारतीय जनता पार्टी व भाजपा युवा मोर्चा च्या वतीने मोदी सरकारचे यशस्वी रित्या सात वर्ष पूर्ण झाल्याबद्दल कोविड लसीकरणासाठी ऑनलाईन नाव नोंदणी अभियान प्रभाग क्रमांक सात मध्ये भाजपाचे उत्तर नगर जिल्ह्याचे अध्यक्ष राजेंद्र गोंदकर व संघटक सरचिटणीस नितीन दिनकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले अशी माहिती भाजपाच्या विशाल अंभोरे व युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष रुपेश हरकल यांनी दिली. 

     या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती जिल्हा सरचिटणीस सुनीलजी वाणी, जिल्हा उपाध्यक्ष अशोक पवार, सतीश सौदागर, गणेश राठी, रामभाऊ तरस, युवा मोर्चाचे प्रदेश सचिव किरण बोऱ्हाडे,जिल्हा चिटणीस अनिल भनगडे ,विठ्ठल राऊत ,बंडूकुमार शिंदे पत्रकार मिलिंद कुमार साळवे ,चंद्रकांत परदेशी, अजित बाबेल, अक्षय नागरे, विजू आखाडे, रवी पंडित, आनंद बुदेकर हे होते. 

        कार्यक्रमाचे उदघाटन श्रीरामपूर तालुका अध्यक्ष बबनजी मुठे व शहराध्यक्ष मारुती बिंगले यांनी केले प्रभाग क्रमांक सात मधील नागरिकांची अत्यंत गैरसोय होत असल्याने भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चा यांनी ही बाब लक्षात येताच लसीकरणासाठी ऑनलाइन नाव नोंदणीचे कॅम्प घेण्यात आला यावेळेस प्रभागातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला .

        या भागातील नागरिकांनी भाजप सरकार यांना सात वर्ष पूर्ण झाली अत्यंत चांगलं काम केल्याबद्दल गणपती मंदिराच्या वतीने भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्रजी गोंदकर यांचा सत्कार रमेश आजगे, दीपक इंगळे,गोविंदा कुर्‍हे, राजेंद्र बोरडे, सुनील हिंगमिरे ,रमेश शेठ गुंदेचा, गोरे गुरुजी, प्रशांत शेठ बोरा ,विजू कुर्‍हे ,केशव कुर्‍हे , नितीन गोडसे, पूर्वेश इंगळे ,हनुमंत आजगे, राहुल कुर्‍हे, नितीन बोरसे आदींनी केला.

कार्यक्रमाचे नियोजन मच्छिंद्र हिंगमिरे ,उत्तमजी आढाव ,निलेश उंडे, विशाल गिते, रमेश आहिरे, साईराम थोरात, राजेश थोरात, रमेश भोरे,सोनू बिराजदार, उदय पाथरकर, पंकज शिंगारे, राजेश पाटील व सर्व पदाधिकारी यांनी केला. 

अशी माहिती भाजपाचे विशाल अंभोरे व युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष रुपेश हरकल व नाथ संघटनेचे मच्छिंद्र हिंगमिरे यांनी दिली.