शिवप्रहार न्यूज- बेलापुर रोडवर अनारसे हॉस्पिटल समोर बोरुडे यांचा मोबाईल हिसकावला...

शिवप्रहार न्यूज- बेलापुर रोडवर अनारसे हॉस्पिटल समोर बोरुडे यांचा मोबाईल हिसकावला...

बेलापुर रोडवर अनारसे हॉस्पिटल समोर बोरुडे यांचा मोबाईल हिसकावला...

श्रीरामपूर - श्रीरामपूर शहरातील बेलापूर रोडवर असणाऱ्या अनारसे हॉस्पिटल च्या समोर दोन अनोळखी आरोपींनी हॉस्पिटल समोरून पायी चालत जात असलेल्या श्रीकांत मच्छिंद्र बोरुडे, वय -तीस वर्ष ,राहणार -राम मंदिर चौक ,लोणार गल्ली ,नंबर 5 ,श्रीरामपूर यांच्या पाठीमागून मोपेड मोटरसायकलवर येऊन त्यांच्या हातातला मोबाइल पाठीमागे बसलेल्या आरोपीने हिसकावून घेतला व ते जबरी चोरी करून पळून गेले.

         याबाबत श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा गुन्हा रजिस्टर नंबर 619/2021 अन्वये दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री.सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक श्री.घायवट हे करीत आहे.