शिवप्रहार न्यूज- अकोले तालुक्यात बंदुकीने केली रानडुक्कराची शिकार; वनविभागाने एकाला केली अटक...

शिवप्रहार न्यूज- अकोले तालुक्यात बंदुकीने केली रानडुक्कराची शिकार; वनविभागाने एकाला केली अटक...

अकोले तालुक्यात बंदुकीने केली रानडुक्कराची शिकार; वनविभागाने एकाला केली अटक...

अकोले : कळसुबाई हरीश्चंद्र अभयारण्यभागातील राजूर वनशेत्रात रानडुक्कर शिकार करत असताना एक आरोपीस अटक करण्यात आली असून चारजण पसार झाले आहेत. अकोले वनपाल कोथळे यांना समजलेल्या गुप्त माहितीतून सोमलवाडी शिवारात जंगली डुकरांची बंदुकीने शिकार झाल्याची माहिती मिळाल्यावर त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेवुन परिस्थीतीची शाहनिशा केली. त्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून गणेश रणदिवे सहायक वनरक्षक काळसूबाई हरिश्चंद्रगड अभयाण्य,दत्तात्रय पडवळे,वनशेत्रपाल वन्यजीव राजूर यांनी घटनास्थानी धाव घेयून चौकशीचे चक्रे वेगाने फिरवून मौजे गंभिरवाडी (सोमलवाडी) येथील एका संशयित आरोपीच्या घरातून अलुमिनियमच्या पातेल्यात ठेवलेले जंगली डुकराचे मांस जप्त करून त्यास तत्काळ चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सदरच्या कारवाईची चाहूल लागल्याने त्याचे इतर साथीदार चार आरोपी पसार झाले.

                पकडलेल्या आरोपीस अटक करून न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग अकोले यांच्यासमोर हजर केले असता त्यास तीन दिवसाची वनकोठडी मिळाली आहे.

 वनविभागाने केलेल्या चौकशीमध्ये आरोपीच्या घराची झडती घेतली असता, त्यात ५ डुक्कर मारण्याचे जाळे,५ वाघुर, २ कोयते ,वाघुराला लावण्याचा काठ्या ,१ दारूची बाटली ,१ बॉटरी,मटन तोडण्याचा लाकडी ठोकळा असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.