शिवप्रहार न्युज - "चुलीत गेले नेते,चुलीत गेले पक्ष,मतदानावर बहिष्कार,नेत्यांना बंदी" बाजाठाणमध्ये झळकले पोस्टर...

शिवप्रहार न्युज -  "चुलीत गेले नेते,चुलीत गेले पक्ष,मतदानावर बहिष्कार,नेत्यांना बंदी" बाजाठाणमध्ये झळकले पोस्टर...

"चुलीत गेले नेते,चुलीत गेले पक्ष,मतदानावर बहिष्कार,नेत्यांना बंदी" बाजाठाणमध्ये झळकले पोस्टर...

बाजाठाण - नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्याच्या सीमेला लागून असलेले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बाजाठाण या गावामध्ये "चुलीत गेले नेते चुलीत गेले पक्ष" तसेच "मतदानावर बहिष्कार, सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी" अशा प्रकारचे पोस्टर आज सोमवारी झळकावण्यात आले.

      तसेच मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या 25 ऑक्टोबर 2023 पासून सुरू होणाऱ्या कडक उपोषणाला जोरदार पाठिंबा देण्यात आला.जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत मराठा समाज मागे हटणार नाही असा गावाच्या वतीने यावेळी निश्चय करण्यात आला. तसेच "एक मराठा लाख मराठा"च्या घोषणा देण्यात आल्या.