शिवप्रहार न्यूज- मेनरोडवरील महाले यांच्या दुकानात बुरखा घातलेल्या महिलेने केली सोने चोरी...

शिवप्रहार न्यूज- मेनरोडवरील महाले यांच्या दुकानात बुरखा घातलेल्या महिलेने केली सोने चोरी...

मेनरोडवरील महाले यांच्या दुकानात बुरखा घातलेल्या महिलेने केली सोने चोरी...

 श्रीरामपूर- श्रीरामपूर शहरातील मेनरोड वरील श्रीराम मंदिर चौक परिसरात असणाऱ्या पोपट भगीरथ महाले यांच्या सोन्याच्या दुकानांमधून सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याची घटना घडली आहे.

       याबाबत अधिक माहिती अशी की एका बुरखा घातलेल्या महिलेने महाले यांच्या सोन्याच्या दुकानात येऊन सेल्समॅनची नजर चुकून 19300 रुपयांचे सोन्याचे कानातील टॉप्स चोरून नेले.

         या प्रकरणी काल रात्री उशिरा महाले ज्वेलर्स दुकानाचे मालक अमोल महाले यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

       श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनकडून आरोपी महिलेचा शोध चालू आहे.