शिवप्रहार न्यूज- श्रीरामपुरात गुढीपाडव्यानिमीत्त भव्य शोभा यात्रा; हिंदू नववर्षाचे जल्लोषात स्वागत...
श्रीरामपुरात गुढीपाडव्यानिमीत्त भव्य शोभा यात्रा; हिंदू नववर्षाचे जल्लोषात स्वागत...
श्रीरामपूर(शिवप्रहार न्यूज) -येथील हिंदू बांधवांच्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त भव्य शोभायात्रा हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यात आले.यावेळी सकाळी साडेनऊ वाजता श्रीरामपूर येथील रेल्वे स्टेशन परिसरातील जागृत देवस्थान हनुमान मंदिर या ठिकाणापासून शोभा यात्रेस प्रारंभ करण्यात आला प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते विधीवत पूजन करण्यात आले.
श्रीरामपूर तसेच पंचक्रोशीतील हिंदू बांधव यांनी पारंपारिक वेशभूषा करत शिस्तबद्ध रित्या पारंपारिक सवाद्य वाद्यांच्या माध्यमातून मिरवणूक हनुमान मंदिर-छत्रपती शिवाजी महाराज चौक-मार्गे मेन रोड गांधी पुतळा अशा पद्धतीने काढण्यात आली.यावेळी हिंदू बांधवांच्या वतीने फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली हिंदु तरुण यांनी लेझीम पथक तसेच तलवार बाजी लाठी-काठी फिरवणे असे प्रात्यक्षिके सादर केले महिला माता भगिणी यांनी पारंपारिक पद्धतीने वेशभूषा करून मिरवणुकीत सहभाग घेतला.यामध्ये श्रीराम माता सीता तसेच लक्ष्मण यांची रथामधुन मिरवणुक काढण्यात आली, यावेळी सुरुवातीला घोड्यावर १ तरुण व २ तरुणी मोठे ध्वज घेऊन विराजमान झाले होते ठिकठिकाणी व्यापारी बंधु यांनी ध्वज पुजन व रथ पुजन करून प्रभु श्रीराम माता सिता लक्ष्मण यांचे दर्शन घेतले.
या शोभायात्रेमध्ये प्रमुख उपस्थिती गुरुवर्य - श्री गणेश बाबा शिंदे, राष्ट्रीय आयुर्वेदिक विद्यापीठ राष्ट्रीय गुरु- डॉ श्री सतीश भट्टड, पर्सनल मॅनेजर अशोक सहकारी साखर कारखाना - श्री लव शिंदे आदी प्रमुख उपस्थित होते. मिरवणुकीचे येथील जैन मंदिर या ठिकाणी पुजन करण्यात येऊन जागृती देवस्थान हनुमान मंदिर या ठिकाणी महाआरतीने समारोप करण्यात आला.