शिवप्रहार न्यूज - गंठण मारले! पत्नीवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार!! गुंगीचे औषध देऊन बलात्कार!!!

शिवप्रहार न्यूज - गंठण मारले! पत्नीवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार!! गुंगीचे औषध देऊन बलात्कार!!!

गंठण मारले! पत्नीवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार!! गुंगीचे औषध देऊन बलात्कार!!!

नगर/श्रीरामपूर (शिवप्रहार न्यूज)- नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील वडनेर बुद्रुक येथील आरोपी अरविंद गोपीनाथ येवले वय-28 याने त्याच्याच पत्नीवर वेळोवेळी निसर्गक्रमांविरुद्ध अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करून शारीरिक व मानसिक छळ केला. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर या नराधम नवऱ्याने दुसरे लग्नही केले. पीडित पत्नीने हा त्रास असहाय्य झाल्याने काल पारनेर पोलिसांत फिर्याद दिल्यावरून आरोपी नवरा अरविंद गोपीनाथ येवले याच्याविरुद्ध भादवी कलम 377, 394, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. नवऱ्याने पत्नीला धमकी दिली आहे. पुढील तपास सपोनि उगले करीत आहे. 

 दुसऱ्या घटनेत श्रीगोंदा तालुक्यातील एका 30 वर्षे वयाच्या विवाहित तरुणीला आरोपी महेश निकाळजे रा-केडगाव, ता-नगर याने कोल्ड्रिंक मधून गुंगीचे औषध देऊन वेळोवेळी लॉजवर व तिच्या घरी बळजबरीने बलात्कार केला. धमकी दिली. तरुणीच्या फिर्यादीवरून आरोपी महेश निकाळजे विरुद्ध श्रीगोंदा पोलीसांत बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सपोनि.माळी हे करीत आहे.

 तिसऱ्या घटनेत काल श्रीरामपूर शहरात रात्री 8ः30 च्या सुमारास रस्त्याने चाललेल्या सविता ज्ञानदेव निर्मळ रा-वार्ड नंबर 7 या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण अज्ञात आरोपीने दुचाकीवरून येऊन गळ्यातून तोडून नेले. घटनास्थळी डीवायएसपी संदीप मिटके, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी भेट दिली. अज्ञात आरोपी विरुद्ध 392 प्रमाणे रास्ता लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सपोनि पाटील आरोपीचा कसून शोध घेत आहे.