शिवप्रहार न्यूज -श्रीरामपूर-नेवासा रस्ता निधी वरुन नेतेमंडळींची चालु आहे पेपरबाजी; दुसरीकडे या भंगार रस्त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हारताय जिवाची बाजी” टाकळीभानजवळ एकाचा अपघाती मृत्यू.

शिवप्रहार न्यूज -श्रीरामपूर-नेवासा रस्ता निधी वरुन नेतेमंडळींची चालु आहे पेपरबाजी;  दुसरीकडे या भंगार रस्त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हारताय जिवाची बाजी”  टाकळीभानजवळ एकाचा अपघाती मृत्यू.

“श्रीरामपूर-नेवासा रस्ता निधी वरुन नेतेमंडळींची चालु आहे पेपरबाजी;

दुसरीकडे या भंगार रस्त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हारताय जिवाची बाजी”

टाकळीभानजवळ एकाचा अपघाती मृत्यू...

श्रीरामपूर - श्रीरामपूर आणि नेवासा या दोन तालुक्यांना जोडणारा मुख्य रस्ता श्रीरामपुर-नेवासा रोडवर टाकळीभान येथील रुक्मिणी मंगल कार्यालय समोर वाहन क्रमांक एम एच झिरो 97 या वाहनाच्या अनोळखी चालकाने गावातील श्री. कचरु सखाराम गायकवाड ,वय 56 वर्षे यांना अरुंद रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून, बेदरकारपणे वाहन चालवून धडक दिली आणि गायकवाड यांना गंभीर जखमी करून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत झाला म्हणून या चालकाविरुद्ध श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 114 /2021 भादवि कलम 304 अ, 279 ,337, 338 मोटार वाहन कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या गुन्ह्याचा तपास पो.नि.श्री.साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे हेडकॉन्स्टेबल शेख हे करीत आहेत.

            एकीकडे नेतेमंडळींनी या श्रीरामपुर-नेवासा रस्त्यासाठी 125 कोटी पेक्षा जास्त रुपयांचा निधी आणला म्हणुन त्याची जोरदार पेपर बाजी देखील केली. परंतु दुसरीकडे या रस्त्याच्या परिस्थितीमध्ये कुठलीही सुधारणा झालेली नसून अति भंगार ,खड्डेमय अशा या रस्त्यावर अनेक अपघात होत असतात आणि लॅाकडाऊन मध्येही हे अपघात सत्र देखील चालूच असल्याचे दिसत आहे. आपरा रस्ता ,रस्त्याच्या तुटलेल्या खोलगट कपारी ,रस्त्यावर मोठे- मोठे खड्डे अशा अवस्थेत असलेल्या या रस्त्याचे काम तात्काळ करून जनतेला दिलासा देण्याच्या ऐवजी नेतेमंडळी हे निधी मंजूर करून आणला याच्या बातम्या पेपरात छापून स्वतःचे उखळ पांढरे करून घेतांना दिसत आहे तर दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांचे जीव जाण्याचे सत्र मात्र थांबत नाहीये.