शिवप्रहार न्यूज- श्रीरामपूर शहर पो.ठाण्याचे ०२ कर्मचारी अँटी करप्शनच्या जाळ्यात अडकले;०६ महिन्यातील तिसरी घटना…

शिवप्रहार न्यूज- श्रीरामपूर शहर पो.ठाण्याचे ०२ कर्मचारी अँटी करप्शनच्या जाळ्यात अडकले;०६ महिन्यातील तिसरी घटना…

श्रीरामपूर शहर पो.ठाण्याचे ०२ कर्मचारी अँटी करप्शनच्या जाळ्यात अडकले;०६ महिन्यातील तिसरी घटना…

 श्रीरामपूर- श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार सुनिल वाकचौरे व पोलीस शिपाई गणेश ठोकळ हे दोन कर्मचारी काल सायंकाळच्या सुमारास नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्याची माहिती समजत आहे.या दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांनी एका गुन्ह्यांमध्ये सहकार्य करण्यासाठी शहरातील एका तक्रारदाराकडून १५ हजारांची लाच मागितली होती व दहा हजार रुपयांची लाच श्रीरामपूर बस स्थानकाजवळ स्वीकारली.

       त्यावेळेस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्यावर छापा टाकला व पकडले.दोन्ही कर्मचारींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

       श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकण्याची सहा महिन्यातील ही तिसरी घटना असून एकूण चार कर्मचारी या सहा महिन्यात लाच घेताना पकडले गेले.त्यामध्ये पोलीस हवालदार काळे,पोलीस नाईक दुधाडे व आत्ता अडकलेले सुनिल वाकचौरे,गणेश ठोकळ यांचा समावेश आहे.