शिवप्रहार न्यूज-गोर-गरीब कोरोना रुग्ण विना बेडचे लागले आहे मरु, खासदार साहेब आता तरी साई खेमांनदला कोविड सेंटर करा सुरु ....

शिवप्रहार न्यूज-गोर-गरीब कोरोना रुग्ण विना बेडचे लागले आहे मरु, खासदार साहेब आता तरी साई खेमांनदला कोविड सेंटर करा  सुरु ....

पढेगाव – श्रीरामपूसह नगर जिल्ह्यात सरकारने लॉकडाऊन केलेला असूनही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे . त्या प्रमाणात आता सरकारी यंत्रणेला व लोकप्रतिनिधींना कोविड सेंटर निर्माण करून या संकटकाळात गोर-गरीब नागरिकांना दिलासा द्यावा लागणार आहे.म्हणून शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी त्यांच्या पढेगाव-उंबरगाव परिसरात असणाऱ्या साई खेमांनद मेडीकल संस्थेमध्ये कोविड सेंटर सुरु करावे, अशी मागणी पढेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते उदय लिप्टे यांनी केली आहे .
खासदार महोदयांच्या या साई खेमानंद मेडीकल संस्थेत मोठी जागा उपलब्ध असून या भव्य इमारतीमध्ये सध्या कुठलेही कामकाज चालू नाही. तरी खासदार महोदयांनी आपल्या या भव्य इमारतीमध्ये गोर-गरीब कोरोना रुग्णांसाठी कोविड सेंटर सुरु करून उंबरगाव,पढेगाव,बेलापूर,मातापूर,कोरेगाव,मालुंजा,लाडगाव,बोधेगाव,कान्हेगाव,अश्या ९-१० गावातील सर्वसामान्य जनतेला या आणीबाणीच्या काळात सहकार्य करावे, अशी मागणी उदय लिप्टे यांनी केली आहे. खासदार महोदयांना जनतेने दुसऱ्यांदा खासदारपदी विराजमान केले त्याची कृतज्ञता म्हणून खासदार महोदयांनी सोयीअभावी मरणाऱ्या गोर-गरीब कोरोना रुग्णांसाठी साई खेमांनद मेडीकल संथेत कोविड सेंटर सुरु करून त्यांचे जीव वाचवावे अशी मागणी होत आहे .