शिवप्रहार न्युज - “माऊशी का बोलतो” म्हणत खुनाचा प्रयत्न करणारे आरोपी श्रीरामपूर पोलीसांनी धरले…

शिवप्रहार न्युज -  “माऊशी का बोलतो” म्हणत खुनाचा प्रयत्न करणारे आरोपी श्रीरामपूर पोलीसांनी धरले…

“माऊशी का बोलतो” म्हणत खुनाचा प्रयत्न करणारे आरोपी श्रीरामपूर पोलीसांनी धरले…

श्रीरामपूर- याप्रकरणी दाखल फिर्यादीत म्हटले आहे की,दिनांक 29/09/2023 रोजी रात्री 9/15 वा. सुमारास उमर फारुक मस्जिदीजवळ, वार्ड नं. 02, श्रीरामपूर येथे माझा भाऊ नामे- सोमनाथ रामदास साळवे, वय 21 वर्षे, रा. बंजरग चौक,वार्ड नं.02, श्रीरामपुर यास माऊशी का बोलतो असे म्हणुन 1 ) केतन त्रिभुवन याने त्याच्या हातातील फायटरने तसेच 2 ) आकाश त्रिभुवन, 3) रेहान शेख उर्फ रोहण नंदु चोधरी, 4)अभिजीत परेकर, 5) अनिल काकडे, सर्व रा. बंजरग चौक, श्रीरामपुर यांनी जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने बेदम मारहाण केली आहे.त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला असुन बेशुध्द आहे, त्याला पुढील उपचाराकरीता न्युरॉन प्लस हॉस्पीटल,नगर येथे अॅडमीट केले आहे.वगैरेच्या तक्रारीवरुन श्रीरामपूर शहर पो. स्टे गुरनं 1064/2023 भादंवि कलम 307,147,148,149, सह मपोका कलम 37 (1) (3) / 135 प्रमाणे दिनांक 30/09/2023 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

      सदर गुन्हा दाखल होताच पोनि. हर्षवर्धन गवळी यांनी सदर गुन्हयाचे तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके व तपास पथकास सदर गुन्हयातील आरोपीचा शोध घेवून अटक करण्याचे तोंडी आदेश दिल्याने तपास पथक तात्काळ घटनास्थळी जावुन पाहणी करुन गुप्तबातमीदार तसेच तांत्रिक विश्लेषण करुन आरोपीचा शोध घेत असतांना तपास पथकास गोपनीय व खात्रीशीर माहिती मिळाली की, सदर गुन्हयातील आरोपी हे अहिल्यादेवीनगर, वार्ड नं.02,श्रीरामपूर येथे आले असुन ते मालेगाव येथे पळुन जाण्याच्या तयारीत आहेत आता गेल्यास मिळुन येतील. अशी माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी तपास पथक तात्काळ गेले असता तपास पथकास पाहुन सदरचे आरोपी हे पळुन जाण्याच्या प्रयत्न करताचा तपास पथकाने त्याचा पाठलाग करुन शिताफीने ताब्यात घेतले व त्यांना नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1) केतन बाबासाहेब त्रिभुवन, वय 22 वर्षे, 2) आकाश सुरेश त्रिभुवन, वय 20 वर्षे, 3)रेहान शेख उर्फ रोहण नंदु चौधरी, वय 20 वर्षे, 4)अरुण संजय काकडे, वय 20 वर्षे, 5)अभिजीत सुरेश परेकर, वय 19 वर्षे, सर्व रा. बजरंग चौक, अहिल्यादेवीनगर, वार्ड नं. 02, श्रीरामपूर असे असल्याचे सांगितले. 

         आपोरींकडे सदर गुन्हयाबाबत चौकशी केली असता सदरील गुन्हा आम्ही मित्रांनी मिळुन केला असल्याची कबुली दिल्याने त्याना नमुद गुन्हयात तात्काळ अटक करण्यात आली आहे.

       सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक राकेश ओला, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर स्वाती भोर तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर, डॉ. बसवराज शिवपुजे यांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस निरीक्षक, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन, हर्षवर्धन गवळी, यांचेकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक/ समाधान सोळंके, पोना/ रघुवीर कारखेले, पोकॉ/ राहुल नरवडे, पोकॉ/ गौतम लगड, पोकॉ/ गणेश गावडे, पोकॉ/ रमिझराजा अत्तार, पोकॉ/ मच्छिद्र कातखडे, पोकॉ/ संभाजी खरात, पोकॉ/ आकाश वाघमारे, यांनी केली असुन दाखल गुन्हयाचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक / समाधान सोळंके हे करीत आहेत.