शिवप्रहार न्यूज-खोटा गुन्हा दाखल केला म्हणून लोणी पोलीस ठाण्यात विष घेवून गेलेल्या उदावंत यांचा दुर्दैवी मृत्यू …
खोटा गुन्हा दाखल केला म्हणून लोणी पोलीस ठाण्यात विष घेवून गेलेल्या उदावंत यांचा दुर्दैवी मृत्यू …
लोणी -राहता तालुक्यातील लोणी बुद्रुक या गावांमध्ये राहणारे अनिल प्रभाकर उदावंत हे मंगळवारी पोलिस ठाण्यात विष घेवुन गेले.त्याबाबत फेसबुकवर अखेरची पोस्ट टाकून त्यांच्याविरुद्ध खोटे गुन्हे दाखल केल्यामुळे विष घेत असल्याचे त्यांनी सांगितले व ही आत्महत्या शेतकरी आत्महत्या समजू नये असे देखील त्यांनी फेसबुक पोस्ट वर म्हटले आहे.
या पोस्टची पडताळणी आता पोलिस तपासात होणार असून लोणी भागात या पोस्ट मुळे खळबळ उडाली आहे.दरम्यान विष प्राशन केलेल्या उदावंत यांची प्रवरा रुग्णालयात उपचार चालू असताना प्राणज्योत मालवली.
या पोस्टमध्ये त्यांनी माझ्याविरुद्ध खोटे गुन्हे देणारे व ते दाखल करणारे माझ्या मृत्यूला जबाबदार आहेत अशी माहिती नमूद केली आहे.त्यामुळे आता पोलिसांना या प्रकरणाचा सखोल तपास करावा लागणार आहे.