शिवप्रहार न्यूज - श्रीरामपूर नगर परिषद ला स्वच्छ सर्वेक्षण 2022 मध्ये शहरांच्या श्रेणीत (वेगवान शहर) म्हणून पुरस्कार प्रदान

शिवप्रहार न्यूज - श्रीरामपूर नगर परिषद ला स्वच्छ सर्वेक्षण 2022 मध्ये शहरांच्या श्रेणीत (वेगवान शहर) म्हणून पुरस्कार प्रदान

श्रीरामपूर नगर परिषद ला स्वच्छ सर्वेक्षण 2022 मध्ये शहरांच्या श्रेणीत (वेगवान शहर) म्हणून पुरस्कार प्रदान

श्रीरामपूर(वातार्हर)- श्रीरामपूर नगर परिषद ला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते स्वच्छ सर्वेक्षण 2022 मध्ये शहरांच्या श्रेणीत fast moving city (वेगवान शहर) म्हणून श्रीरामपूर शहराला पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार श्रीरामपूर नगर परिषदेचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी अनिल पवार, मुख्याधिकारी गणेश शिंदे यांना देण्यात आले.

      शनिवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी नवी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियममध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते स्वच्छ सर्वेक्षण 2022 मध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या शहरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कचरा मुक्त शहरांची निर्मिती या महत्वाकांक्षी दृष्टिकोनाने 1 ऑक्टोबर 2021 रोजी पंतप्रधानांनी सुरु केलेल्या स्वच्छ भारत अभियान-शहर 2.0 च्या पहिल्या वर्धापन दिना निमित्त, हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. पुरस्कार सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री हरदीप सिंग पुरी, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे राज्य मंत्री कौशल किशोर,केंद्रीय सचिव मनोज जोशी हे यावेळी उपस्थित होते.

शहरी विकास मंत्री आणि देशभरातील महापौर यांचा समावेश असून त्यांच्या उपस्थितीत विविध श्रेणींमधील पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये पन्नास हजार ते एक लाख लोकसंख्या असलेल्या शहरांच्या श्रेणीत fast moving city (वेगवान शहर) म्हणून श्रीरामपूर शहराला पुरस्कार प्रदान करण्यात आला. सदर पुरस्कार स्वीकारण्यासाठी श्रीरामपूर नगर परिषदेचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी अनिल पवार, मुख्याधिकारी गणेश शिंदे, आरोग्य विभागाचे रावसाहेब घायवट व पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता मनोज ईश्वरकट्टी हे नवी दिल्ली येथे उपस्थित होते. सदर पुरस्कार गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे राज्य मंत्री कौशल किशोर,केंद्रीय सचिव मनोज जोशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

      श्रीरामपूर नगर परिषदेला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल पालिकेचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी अनिल पवार व मुख्याधिकारी गणेश शिंदे यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.

फोटो ओळी 

श्रीरामपूर- श्रीरामपूर नगर परिषद ला केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री हरदीप सिंग पुरी, हस्ते स्वच्छ सर्वेक्षण 2022 मध्ये शहरांच्या श्रेणीत fast moving city (वेगवान शहर) म्हणून श्रीरामपूर शहराला पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार घेताना श्रीरामपूर नगर परिषदेचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी अनिल पवार, मुख्याधिकारी गणेश शिंदे यांना देण्यात आले.आरोग्य विभागाचे रावसाहेब घायवट व पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता मनोज ईश्वरकट्टी आदी.