शिवप्रहार न्यूज- श्रीरामपूर शहरातील बजरंग व्यायामशाळेत हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा…

शिवप्रहार न्यूज- श्रीरामपूर शहरातील बजरंग व्यायामशाळेत हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा…

श्रीरामपूर शहरातील बजरंग व्यायामशाळेत हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा…

श्रीरामपूर : शहरातील पहिली व्यायामशाळा नगरपालिकेच्या वाचनालयातील बजरंग व्यायामशाळेत हनुमान जन्मोत्सवानिमित्त शनिवारी पहाटे ६ वाजता पालिकेचे प्रशासक तथा प्रांताधिकारी अनिल पवार व सौ. पवार या दाम्पत्याच्या हस्ते हनुमान मुर्तीस अभिषेक करून जन्मोत्सव साजरा करण्यात आला.

        यावेळी हनुमंतरायाची आरती पोलिस उपअधिक्षक संदीप मिटके यांच्या हस्ते करण्यात आली. याप्रसंगी मुख्याधिकारी गणेश शिंदे, बजरंग व्यायामशाळेचे अध्यक्ष राजेंद्र पानसरे, कार्याध्यक्ष, दै.जयबाबाचे कार्य.संपादक मनोजकुमार आगे, उपाध्यक्ष राजेंद्र पठाडे, सदस्य चंद्रकांत सगम, पालिकेचे माजी नगराध्यक्ष संजय फंड, माजी नगरसेवक रविंद्र गुलाटी, राजेश अलघ, दिलीप नागरे, प्रकाश बोकन,मुक्तार शहा, माधव हासे, प्रकाश ढोकणे, सागर बेग, कृष्णा शिंदे, भारत कोळेकर, कृष्णा जाधव, किशोर वाडीले, मनोज भुजबळ, दीपक परदेशी, रोहित हिवराळे, शिवराज बिडवे, श्रीनाथ शिंदे, दीपक व्यवहारे, प्रवीण ढुमने, शाम दळवी, शैलेश नरळे, दत्ता टेलर,रुपेश बोऱ्हाडे, बंटी पटारे, शंकरराव करोडीवाल, दत्तात्रेय खेमनर, बजरंग व्यायामशाळेचे राजेंद्र गोंदकर, स्वाती पुरे, राजेंद्र बोरकर, कुस्ती प्रशिक्षक सुनिल गांगुर्डे, मनोज भुजबळ आदी उपस्थित होते. 

       महाआरतीनंतर दुपारी महाप्रसादाचा अनेकांनी लाभ घेतला.