शिवप्रहार न्यूज- पोटात विष गेल्याने कामगार हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू...
पोटात विष गेल्याने कामगार हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू...
श्रीरामपूर - श्रीरामपूर तालुक्यातील गोवर्धन-माळेवाडी भागात राहणाऱ्या भारत रावसाहेब सोनवणे या सतरा वर्षे वयाच्या तरुणाचा पोटात विषारी औषध गेल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
अधिक माहिती अशी की,भारत सोनवणे याच्या पोटात दिनांक 09 ऑगस्ट 2021 रोजी काहीतरी विषारी औषध गेल्याने त्याला सायंकाळी कामगार हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले होते.काल उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे कामगार हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.
या प्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात अप मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.
भारत सोनवणे यांच्या अकाली जाण्याने गोवर्धन- माळेवाडी परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.