शिवप्रहार न्यूज -मंत्री तनपुरेंनी बैठकीस उशीरा आलेल्या तहसिलदारांना खडसावले.

शिवप्रहार न्यूज -मंत्री तनपुरेंनी बैठकीस उशीरा आलेल्या तहसिलदारांना खडसावले.

मंत्री तनपुरेंनी बैठकीस उशीरा आलेल्या तहसिलदारांना खडसावले...

वांबोरी – वांबोरी गावात वाशिलेबाजीने लसीकरण केले जात असल्याचा आरोप नागरिकांनमधून झाल्यानंतर वैदकीय विभागाचा गलथान कारभार मंत्र्यांसमोर उघड झाला. त्यामुळे यासाठी सर्वस्वी वैदकीय अधिकारी जबाबदार असतील असे म्हणत वैदकीय अधिकारी यांना मंत्री प्राजक्तदादा तनपुरे यांनी खडेबोल सुनावले.

    या वेळी घेण्यात आलेल्या बैठकीला हजर राहण्यास उशीर करणारे तहसीलदार फयसोद्दीन शेख यांचीही ना.तनपुरे यांनी चांगलीच कानउघडणी केली. काल सकाळी दहाच्या सुमारास मंत्री तनपुरे यांचा ताफा ग्रामपंचायतीत पोहचला बैठक सुरु होऊन अर्धा तास झाला तरी बैठकीसाठी तहसीलदार पोहचले नव्हते. त्यावर मंत्री तनपुरे म्हणाले की,तहसीलदारांना वेळेच भान आहे कि नाही?लोकप्रतिनिधींनी वाट पहात बसायचे का? असा संताप व्यक्त केला. त्यांनतर पावणे अकराच्या सुमारास तहसीलदार बैठकीला पोहचले त्यावेळी मंत्र्यांनी त्यांना चांगलेच खडसावले .