शिवप्रहार न्युज - बचत गटात शिरल्या बनावट नोटा?रामनवमीतही बनावट नोटा गेल्याची चर्चा?

बचत गटात शिरल्या बनावट नोटा?रामनवमीतही बनावट नोटा गेल्याची चर्चा?
श्रीरामपूर - शहरातील बेलापूर रोड वार्ड नंबर ०७, बजरंगनगर परिसरामध्ये एका महिला बचत गटामध्ये बनावट पाचशेंच्या नोटा शिरल्याची आज दिवसभर चर्चा चालू होती.
तसेच श्रीरामपूरची यात्रा रामनवमी शहरात सध्या सुरू असुन या निमित्ताने थत्ते ग्राउंडवर असलेल्या पाळण्यांत अनेक लोक पाहायला-बसायला येतात.तर मेन रोडवर लागलेल्या विविघ दुकानांमध्ये खरेदी करायला नागरिक,महिला गर्दी करतात. त्याही ठिकाणी ह्या बनावट नोटा गेल्या अशी चर्चा चालू आहे.नेमका हा काय प्रकार आहे ? यात कितपत तथ्य आहे ? आणि किती संख्येने या नोटा मार्केटमध्ये शिरल्या आहेत ? याचा शोध घेणे गरजेचे आहे.