शिवप्रहार न्यूज- शिक्षकाने केला शिक्षिकेचा विनयभंग;तक्रार पोलीसाऐवजी मुख्याध्यापकाकडे…

शिवप्रहार न्यूज- शिक्षकाने केला शिक्षिकेचा विनयभंग;तक्रार पोलीसाऐवजी मुख्याध्यापकाकडे…

शिक्षकाने केला शिक्षिकेचा विनयभंग;तक्रार पोलीसाऐवजी मुख्याध्यापकाकडे…

शिर्डी/प्रतिनिधी -राहता तालुक्यातील एका नावाजलेल्या शिक्षण संस्थेच्या हायस्कूलमध्ये एका चाळेबाज शिक्षकाने त्याच्या सवयीप्रमाणे शाळेतीलच एका शिक्षिकेचा विनयभंग केला.धक्कादायक बाब म्हणजे नको तेथे हात लावून त्याने शिक्षिकेचा विनयभंग करून पुन्हा पुन्हा शरीर सुखाची मागणी केली.एवढा भयानक प्रकार घडूनही संस्थेच्या व्यवस्थापनाच्या दबावामुळे व नोकरीच्या भीतीमुळे बिचाऱ्या पिडित शिक्षिकेला नालायक शिक्षकासंबंधी पोलीसाऐवाजी मुख्याध्यापकाकडे लेखी तक्रार करावी लागली.

      यासंबंधी संबंधित हायस्कूलच्या मुख्याध्यापकाशी संपर्क साधला असता त्याने सदर पीडित शिक्षिकेने संबंधित विनयभंग करणाऱ्या शिक्षकाच्या नावानिशी संस्थेकडे तक्रार केली असून मी ती वरिष्ठांना कळवून कठोर कारवाईची भूमिका घेणार आहे. हा शिक्षक माझ्यापण डोक्यात आहे असे संबंधित मुख्याध्यापकाने नाव न बातमीत येण्याच्या अटीवर सांगितले.  

       मात्र धक्कादायक बाब म्हणजे शाळेतच शिक्षकाने आपल्या शाळेच्या शिक्षिकेचा विनयभंग करून सदर प्रकरण मिटविण्यासाठी मुख्याध्यापक मांडवली करीत असल्याची चर्चा शाळेच्या परिसरात सुरू असून यासंबंधी पीडित शिक्षिकेला पोलिसात तक्रार देण्यापासून कोणी रोखले? तिच्यावर कोणी दबाव टाकला ?मुख्याध्यापकाकडे तक्रार करून तिला न्याय मिळणार आहे का ?कारण सदर शिक्षकाने दोन ठिकाणी असाच शिक्षिकेच्या विनयभंगाचा प्रकार केला होता.मात्र तेथे त्यानी पन्नास हजाराच्या पुढे सेटलमेंट करून प्रकरणावर पडदा पाडला.

       आता याही प्रकरणात तो सेटलमेंट करून वाचणार कि शाळेचे व्यवस्थापन त्याला धडा शिकवणार.त्या शिक्षेला शिक्षिकेला पोलिसात फिर्याद द्यायला लावणार याकडे आता परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.असा शिक्षक सुटू नये कारण म्हातारी मेल्याचे दुःख नको पण काळ सोकवायला नको कारण या शिक्षकाचा तिसरा प्रकार आहे व्यवस्थापन म्हणते संस्थेची बदनामी नको.मग आंधळ दळतय आणि कुत्र पीठ खात असे प्रकार घडले तरी त्याकडे दुर्लक्ष करायचे का ?अशी मार्मिक टीका होत आहे.शिक्षक महिलेला नागरिक धीर देत आहे कि तुम्ही घाबरू नका पोलिसात जाणण्याचा सल्ला देत आहे.