शिवप्रहार न्यूज -संपादक व पत्रकार सेवा संघाची राहुरी तालुक्यात  स्थापना

शिवप्रहार न्यूज -संपादक व पत्रकार सेवा संघाची राहुरी तालुक्यात  स्थापना

संपादक व पत्रकार सेवा संघाची राहुरी तालुक्यात  स्थापना...


देवळाली प्रवरा-
ग्रामीण भागातील पत्रकारांच्या दृष्टीने जाचक असणारे ला संपादक व पत्रकार सेवा संघाच्याअधिस्वीकृतीचे निकष बदलण्यासाठी सरकार माध्यमातून भाग पाडू अशी ग्वाही संस्थापक अध्यक्ष किसनभाऊ हासे यांनी दिली आहे.
        तर पत्रकारांनी आपसातील आकस दूर करून एकत्रितपणे लढा उभारण्याचे आवाहन  जिल्हा अध्यक्ष मनोजकुमार आगे यांनी केले आहे.
पत्रकारांच्या हितासाठी राज्य पातळीवर काम करणाऱ्या संपादक व पत्रकार सेवा संघाचे राहुरी तालुका कार्यकारिणी जाहीर करून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र व ओळख पत्र वितरण सोहळा मनोजकुमार आगे यांचे अध्यक्षतेखाली लोकनेते रामदास धुमाळ महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न झाला.
        जेष्ठ पत्रकार सुधाकर कराळे,सय्यद निसारभाई,नरेंद्र लचके उपस्थित होते.
       दिवंगत पत्रकार मित्रांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आल्या नंतर जिल्हाध्यक्ष मनोज कुमार आगे यांनी राहुरी तालुका कार्यकारिणी ची घोषणा केली व मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र व सदस्य ओळख पत्र वितरित करण्यात आले. 
         याप्रसंगी जाहीर करण्यात आलेली संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र ची राहुरी तालुका कार्यकारिणी पुढील प्रमाणे.
मार्गदर्शक निसारभाई सय्यद, तालुकाध्यक्ष विजय येवले, उपाध्यक्ष प्रभाकर मकासरे, सुनील भुजाडी, संघटक विजय डौले, सचिव रफिकभाई शेख, कार्याध्यक्ष गणेश विघे, समन्वयक कर्णा जाधव,    खजिनदार भिमराज गुंड, कायदेशीर सल्लागार ॲड भाऊसाहेब पवार, प्रसिद्धी प्रमुख बंडू म्हसे, सह सचिव गोविंद साळुंके,देवळाली प्रवरा शहराध्यक्ष अशोक काळे, उपाध्यक्ष चेतन  कदम यांची निवड करण्यात आली.
         संपादक व पत्रकार सेवा संघ ही संघटनचे उद्धिष्ट व आजपर्यंतचा कार्यकाळ  पत्रकार रफीक शेख यांनी प्रस्ताविक मधून विशद केला.
   किसनभाऊ हासे म्हणाले की या संघटनेच्या माध्यमातून २०१८ साली  राज्यातील लहान वृत्तपत्रांना संपवण्याचा घाट हाणून पाडला, भविष्यातही ग्रामीण पत्रकार,छोटे वृतपत्र यांच्या समस्या सोडवण्यासाठी,त्यांना सन्मान मिळवून देण्यासाठी संघ कटीबद्ध आहे.विविध शासकीय समित्यांवर  अशासकीय सदस्य म्हणून पुढील काळात पत्रकारांचीच नेमणूक करण्यात यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.पत्रकारांनी आपले चांगले कार्य करतांना त्यांच्यावर कुणी अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर संघटना पाठीशी खंबीरपणे उभी राहिल अशी स्पष्ट ग्वाही किसनभाऊ हासे यांनी दिली.
     अहमदनगर जिल्ह्यातील पत्रकारितेला मोठा वारसा आहे,परिपक्व,सकारात्मक,व प्रसंगी नाठाळाच्या माथी टोला देणारी पत्रकारिता आपल्या जिल्हयात आहे.एवढे असतांना आपल्याच क्षेत्रात काही माणस हा छोटा तो मोठा मी शहरी तू ग्रामीण असा भेदभाव करून एकमेकां विषयी आकस भावना ठेवतात आणि त्यामुळेच खऱ्या अर्थाने पत्रकारांची हेळसांड होते.पत्रकारांनी एकत्रित येऊन आपल्या समस्या सोडवण्याचे आवाहन त्यांनी केले.
   याप्रसंगी सय्यद निसारभाई,सुनील भुजाडी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी दत्ताम्हसे,पत्रकार सर्वश्री नंदकुमार शिरसाठ, सुरेश तरकसे,अशोक बाबासाहे तुपे, , विश्वनाथ जाधव मनोज हासे, राजेश मंचरे, पत्रकार गणेश विघे यांनी सूत्रसंचालन केले तर पत्रकार विजय डौले यांनी आभार मानले.