शिवप्रहार न्यूज -शेतकऱ्याने टरबुजाचे पेमेंट मागितले म्हणुन राहत्याचा व्यापारी अकबर शेख ने दिली जीवे ठार मारण्याची धमकी..
शेतकऱ्याने टरबुजाचे पेमेंट मागितले म्हणुन राहत्याचा व्यापारी अकबर शेख ने दिली जीवे ठार मारण्याची धमकी...
राहुरी - राहुरी तालुक्यातील कुरणवाडी येथे राहणारे तरुण शेतकरी श्री.दत्तात्रय सिताराम खिलारी, वय- 31 यांनी टरबुजाचे पीक घेतले होते. टरबूज तयार झाल्यानंतर त्यांनी तो टरबूजाचा माल राहता तालुक्यातील अस्तगाव फाटा परिसरात राहणारा व्यापारी अकबर शेख याला दिला होता. तेव्हा अकबर ने माल घेतला आणि पेमेंट नंतर करतो असे सांगून तो माल घेवुन निघून गेला.
त्यानंतर अनेक दिवस पेमेंट मिळाले नाही म्हणून दत्तात्रय खिलारी यांनी व्यापारी अकबर शेख याला फोन करून माझ्या टरबुजाच्या मालाचे पेमेंट देऊन टाका अशी विनंती केली. त्याचा व्यापारी अकबर शेख याला राग आला आणि त्याने शेतकरी श्री. दत्तात्रय खिलारी यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली आणि तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली. म्हणून शेतकरी दत्तात्रय खिलारी यांनी राहुरी तालुका पोलीस ठाण्यात व्यापारी अकबर शेख याच्याविरुद्ध तक्रार दिली.
त्या दिलेल्या तक्रारीवरून राहुरी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंद क्रमांक 335 /2021 भारतीय दंड विधान कलम 507 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार श्री.जाधव हे करीत आहेत.
या प्रकारामुळे शेतकर्यांनी कष्ट करुन काढलेला माल व्यापारी लोकांना विश्वासाने द्यायचा की नाही याबाबत शंका निर्माण झाली आहे.