शिवप्रहार न्यूज- श्रीरामपुरातील लसीकरण केंद्रावर झालेला गोंधळ थांबवण्यासाठी सर्वपक्षीय नेते मंडळी जमली...
श्रीरामपुरातील लसीकरण केंद्रावर झालेला गोंधळ थांबवण्यासाठी सर्वपक्षीय नेते मंडळी जमली...
श्रीरामपूर - श्रीरामपूर येथील आझाद मैदान , मेनरोड वाचनालय याठिकाणी चालू असलेल्या लसीकरण केंद्रामध्ये दुसऱ्या डोससाठी लसीकरण चालू होते.परंतु काही नागरिकांनी या लसीकरणाकडे पाठ फिरवल्याने लसीचे डोस शिल्लक राहिले.
या शिल्लक राहिलेल्या डोसचा वापर पहिला डोस म्हणून करण्याचा निर्णय येथील प्रशासनाने घेतल्याने अचानक लोकांची गर्दी वाढू लागली.काहीजणांनी गेट ची साखळी तोडून आत मध्ये प्रवेश करून धक्काबुक्की केली.त्यामुळे एकच गोंधळ उडाला.
या घटनेची माहिती मिळताच प्रांत अधिकारी श्री.पवार तहसीलदार श्री.पाटील पोलीस निरीक्षक श्री.सानप यांच्यासह नगराध्यक्ष व सर्वपक्षीय नेते तात्काळ या ठिकाणी हजर झाले. त्यानंतर हा गोंधळ थांबला.