शिवप्रहार न्यूज- श्रीरामपुरातील अनधिकृत लॅबची चौकशी व्हावी;महिलेची मागणी..
श्रीरामपुरातील अनधिकृत लॅबची चौकशी व्हावी;महिलेची मागणी..
श्रीरामपूर - श्रीरामपूर शहरातील काही लॅबचालक अनधिकृतपणे व्यवसाय करत आहेत.त्यामुळे त्यांच्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी श्रीरामपूरातील एका महिलेने आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,या तक्रारदार महिलेने निवेदनात म्हटले आहे की,काही लॅबधारकांकडे कोणतीही पदवी नाही.तरीदेखील ते लोक रक्त, लघवी सॅम्पल ची तपासणी करतात.तसेच कोरोना चाचण्या देखील करतात.
त्यामुळे या लोकांवर कारवाई करावी अशी मागणी या तक्रारदार महिलेने केली आहे.या तक्रारदार महिलेने असे निवेदन जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री ,जिल्हा आरोग्य अधिकारी यांना देखील पाठविले आहे.