शिवप्रहार न्यूज- ओव्हर ब्रिज जवळ दरोड्याची तयारी करणाऱ्या तिघांना शहर पोलिसांनी पकडले…

ओव्हर ब्रिज जवळ दरोड्याची तयारी करणाऱ्या तिघांना शहर पोलिसांनी पकडले…
श्रीरामपूर - श्रीरामपूर शहरातील शिरसगाव शिवारातील ओव्हर ब्रिज परिसरातील इंदिरानगर जवळ आरोपी ०१)निसार शेख ,वय ३८ वर्ष ,राहणार -हुसेननगर, श्रीरामपूर ०२) राजू दामोधर ,वय ४३ वर्ष,राहणार- हुसेन नगर,श्रीरामपूर ०३)तोफिक पठाण यांना शहर पोलिसांच्या पथकाने पकडले.
त्यावेळी त्यांच्याजवळ एक चाकू, नायलॉन दोरी,मिरचीपूड व लोखंडी कटावणी मिळून आली.याप्रकरणी पोलिस शिपाई गौरव दुर्गुळे यांच्या तक्रारीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 88/2022 भादवि कलम 399,402 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई श्री.मनोज पाटील पोलीस अधीक्षक,नगर ,श्रीमती स्वाती भोर ,अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, डीवायएसपी श्री.संदीप मिटके ,पोलिस निरीक्षक श्री.संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि जीवन बोरसे ,पोलीस नाईक -पंकज गोसावी,बिरप्पा करमल,सचिन बैसाने,रघुवीर कारखेले ,तसेच पोलीस शिपाई -राहुल नरवाडे, गौतम लगड,रमिज आत्तार, गौरव दुर्गुळे,महेश पवार यांच्या पथकाने केली.