शिवप्रहार न्युज - प्रभू श्रीरामांच्या अवमान प्रकरणी आज बेलापूर कडकडीत बंद...

प्रभू श्रीरामांच्या अवमान प्रकरणी आज बेलापूर कडकडीत बंद...
श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- अखंड हिंदुस्तानचे व हिंदु धर्माचे श्रद्धास्थान असलेले प्रभू श्रीराम यांच्या बद्दल बेलापूर येथील समाजकंटक आदिल रसूल शेख याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट करून हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या याचा जाहीर निषेध म्हणून आज शनिवारी सकल हिंदू समाजाच्यावतीने बेलापूर कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे. या बंदला बेलापूर ग्रामस्थांनी आणि व्यापारी वर्गाने स्वयंस्फूर्तीने उस्फूर्त प्रतिसाद देऊन गाव कडकडीत बंद ठेवले आहे.
या बंदला अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी पाठींबा दिला आहे. बेलापूर बुद्रुक, बेलापूर खुर्दसह कोल्हार चौक कडकडीत बंद आहे. बंद काळात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून डीवायएसपी बसवराज शिवपुजे, पोनि.हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली बेलापूर पोलीस दुरक्षेत्रचे एपीआय जीवन बोरसे, एएसआय सुधीर हापसे, पोना.रामेश्वर ढोकणे, पोकॉ.हरिष पानसंबळ, भारत तमनर, संपत बडे, नंदकिशोर लोखंडे यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.