शिवप्रहार न्यूज- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची विटंबना करणार्यांवर कठोर कारवाईची मागणी - भाजपा युवा मोर्चा
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची विटंबना करणार्यांवर कठोर कारवाईची मागणी - भाजपा युवा मोर्चा
श्रीरामपूर:- कर्नाटक राज्यातील बंगळुरू येथील सदाशिव नगर भागातील अखंड विश्वाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या नराधमास कडक शासन करण्याबाबत श्रीरामपूर तहसीलदार श्री प्रशांत पाटील साहेब यांना भारतीय जनता युवा मोर्चा, श्रीरामपूर च्या वतीने निवेदन देण्यात आले.
ज्यांनी हे कृत्य केले अशा नराधमांचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करून गुन्हेगारांवर अत्यंत कडक कारवाई करून त्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि असे प्रकार भविष्यात घडू नये याबाबत प्रशासनाने योग्य ती काळजी घ्यावी असे युवा मोर्चा चे शहराध्यक्ष अक्षय वर्पे यांनी संताप व्यक्त केला.यावेळी युवा मोर्चा चे जिल्हा सरचिटणीस विशाल यादव, जिल्हासचिव अक्षय नागरे, शहराध्यक्ष अक्षय वर्पे, सरचिटणीस श्रेयस झिरंगे, उपाध्यक्ष गौतम जावरे, संजय गाडेकर, अमोल शिंदे, गणेश कर्डे, लोकेश बालानी, सचिव सिद्धांत वाणी, प्रतीक वाघमारे, IT सेल जिल्हा संयोजक श्रजल त्रिवेदी, IT सेल जिल्हा समन्वयक जितू गाडेकर उपस्थित होते.
तसेच भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गणेश राठी, शहराध्यक्ष मारुती बिंगले, सांस्कृतिक सेल जिल्हा सयोजक बंडुकुमार शिंदे, सरचिटणीस रवी पंडित, दत्तात्रय देवकाते आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.