शिवप्रहार न्यूज - कारेगांव, अशोकनगर मध्ये जबरी चोऱ्या करणारे पकडले, 11.5 तोळे सोन्यासह तवेरा जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
कारेगांव, अशोकनगर मध्ये जबरी चोऱ्या करणारे पकडले, 11.5 तोळे सोन्यासह तवेरा जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- कारेगांव व अशोकनगर ता. श्रीरामपूर तसेच नगर तालुका येथील शेतावरील वस्तीवर जावुन घरात प्रवेश व गंभीर दुखापत करुन जबरी चोरी करणारी सराईत आरोपींची आंतरजिल्हा टोळी पोलिस अधिक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली जेरबंद करण्यात आली.
आरोपींकडून 9,75,000/- रु.किंचे (नऊ लाख पच्चाहत्तर हजार रु.किंचे) 11.5 तोळे (115 ग्रॅम) व एक तवेरा गाडी जप्त करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, दिनांक 04/11/2022 रोजी फिर्यादी निखील बाळासाहेब वाघ, वय 22, रा. वाघवस्ती, चारी क्र.11, कारेगांव, ता. श्रीरामपूर हे रात्रीचे जेवण करुन दरवाजा खिडक्या बंद करुन कुटूंबियासह झोपलेले असतांना अनोळखी चार इसमांनी फिर्यादीचे घराचे किचनचे दरवाजाची कडीकोंडा कटावणीच्या सहाय्याने तोडुन घरात प्रवेश करुन, चाकुचा धाक दाखवुन साक्षीदारांना कटावणी व लाथाबुक्यांनी मारहाण व जखमी करुन घरातील सामानाची उचका पाचक करुन 2,71,000/- हजार रु.किंमतीचे सोन्याचे दागिने घेवुन गेले होते. तसेच जातांना फिर्यादी यांचे गावातील सचिन अरुण जगताप याचे बंद घराचा दरवाजा तोडुन कपाटातील 10,000/- हजार रु. रोख रक्कम असा एकुण 2,81,000/- हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल बळजबरीने चोरुन नेला होता. सदर घटने बाबत श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन गु.र.नं. 427/2022 भादविक 394, 380, 457 प्रमाणे आरोपी विरुध्द जबरी चोरी घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वरिल गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवुन राकेश ओला, पोलीस अधिक्षक अहमदनगर यांनी पोनि अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना सदर ना उघड गुन्हा उघडकिस आणणे करीता विशेष पथक नेमुन कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.
नमुद आदेशा प्रमाणे पोनि अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि/दिनकर मुंडे, पोसई/सोपान गोरे, पपोसई/विठ्ठल पवार, पपोसई/संदीप ढाकणे, पपोसई/ विजय भोंबे, सफौ/मनोहर शेजवळ, पोहेकॉ/सुनिल चव्हाण, बबन मखरे, दत्ता हिंगडे, संदीप पवार, बापुसाहेब फोलाणे, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, विश्वास बेरड, पोना/शंकर चौधरी, संदीप दरंदले, ज्ञानेश्वर शिंदे, संदीप चव्हाण, भिमराज खर्से, रवि सोनटक्के, दिपक शिंदे, पोकॉ/विनोद मासाळकर, जालिंदर माने, सागर ससाणे, विजय धनेधर, रविंद्र घुंगासे, योगेश सातपुते, मेघराज कोल्हे, मपोना/भाग्यश्री भिटे, मपोकॉ/ज्योती शिंदे, सारीका दरेकर, चापोहेकॉ/उमाकांत गावडे, बबन बेरड, संभाजी कोतकर व भरत बुधवंत अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन सदर ना उघड गुन्ह्यांतील आरोपींची माहिती व शोध घेणे बाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.
स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक श्रीरामपूर, नेवासा परिसरात फिरुन आरोपींची माहिती घेत असतांना पोनि अनिल कटके, स्थागुशा यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, काही संशयीत इसम तवेरा गाडीमधुन चोरीचे सोने विक्री करण्यासाठी औरंगाबादकडुन अहमदनगरकडे येणार आहेत. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि अनिल कटके यांनी सदर बातमीतील संशयीत इसमाची खात्री करुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्या. नमुद सुचना प्रमाणे स्थागुशा पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी खडका फाटा, ता. नेवासा येथे जाऊन आजुबाजूला दबा धरुन, सापळा लावुन थांबलेले असतांना बातमीतील वर्णना प्रमाणे एक तवेरा गाडी येताना दिसली. पथकाची खात्री होताच गाडीस आडवे होऊन थांबण्याचा इशारा केला असता संशयीतांनी वाहनाचा वेग कमी करताच वाहनामध्ये बसलेले इसमांनी तवेरा गाडीचा दरवाजा उघडुन पळुन जावु लागले. पथकाने त्यांचा पाठलाग केला परंतु ते मिळुन आले नाही. त्याचवेळी पथकातील इतर अंमलदारांनी थांबलेल्या वाहनातील 3 (तीन) इसमांना जागीच पकडुन पोलीस असल्याची ओळख सांगुन त्यांना त्याचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1) आर्यन ऊर्फ एरीयल ऊर्फ काळु कांतीलाल काळे, वय 26, रा. नवापुरवाडी, ता. गंगापुर, जिल्हा औरंगाबाद, 2) विदेश नागदा भोसले, वय 19, रा. नवापुरवाडी, ता. गंगापुर, जिल्हा औरंगाबाद व 3) भोईट्या ऊर्फ डसल्या ऊर्फ आदित्य कांतीलाल काळे, वय 21, रा. मानगल्ली, नेवासा फाटा, ता. नेवासा असे असल्याचे सांगितले. त्यांचेकडे अहमदनगरमध्ये येण्याचे कारण विचारले असता सुरुवातीस ते उडवा उडवीची उत्तरे देवु लागले त्यावेळी ताब्यातील तवेरा गाडीची झडती घेता गाडीचे ड्राव्हरमध्ये एक कापडी पिशवी मिळुन आली. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सोन्याचे दागिने मिळाले. मिळुन आलेल्या दागिन्याबाबत अधिक विश्वासात घेवुन विचारपुस करता त्यांनी श्रीरामपुर व नगर तालुका परिसरात घरात घुसून मारहाण करुन चोरी केलेले सोने विक्री करण्यासाठी जात असल्याचे कबुल केले.
आरोपीने दिलेल्या कबुली अनुषंगाने अहमदनगर जिल्हा गुन्हे अभिलेख तपासले असता खालील प्रमाणे एकुण 04 गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झालेले आहेत.
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं.
1. श्रीरामपूर शहर 710/2022 भादविक 392, 457, 341, 34
2. श्रीरामपूर तालुका 427/2022 भादविक 394, 380, 457
3. नगर तालुका 766/2022 भादविक 394, 397, 506, 34
4. नगर तालुका 746/2022 भादविक 457, 380, 459
तक्त्यात नमुद दाखल गुन्ह्यात जबरी चोरी झालेले 9,75,000/- रु.किंमतीचे 115 ग्रॅम वजनाचे दागिने व एक तवेरा गाडीसह आरोपीचे ताब्यात मिळुन आल्याने त्यांना मुद्देमालासह श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील कारवाई श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन करीत आहे.
आरोपी आर्यन ऊर्फ एरीयल कांतीलाल काळे यांचे विरुध्द विविध पोलीस स्टेशनला दरोडा, जबरी चोरी, चोरी व अपहरण करुन विनयभंग करणे असे गंभीर स्वरुपाचे एकुण -12 गुन्हे दाखल आहेत. ते खालील प्रमाणे
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं.
1. शिलेगाव,गंगापुर, जिल्हा औरंगाबाद 228/2014 भादविक 395
2. गंगापुर, जिल्हा औरंगाबाद 271/2014 भादविक 395, 397, 341
3. कर्जत, जिल्हा अहमदनगर 245/2014 भादविक 392, 376(ड), 34
4. गंगापुर, जिल्हा औरगाबाद 196/2019 भादविक 395, 341
5. नेवासा, जिल्हा अहमदनगर 318/2019 भादविक 395, 323, 504, 506
6. श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर 465/2019 भादविक 363, 354(अ), 143, 147, 148, 149 (फरार)
7. राहाता, जिल्हा अहमदनगर 86/2019 भादविक 379, 34
8. वैजापुर, जिल्हा औरंगाबाद 166/2019 भादविक 395, 341
9. शनिशिंगणापुर, जिल्हा अहमदनगर 78/2019 भादविक 395, 341 आर्म ऍ़क्ट 4/25
10. श्रीरामपूर शहर 710/2022 भादविक 392, 457, 341, 34
11. श्रीरामपूर तालुका 427/2022 भादविक 394, 380, 457
12. नगर तालुका 766/2022 भादविक 394, 397, 506, 34
आरोपी नामे विदेश नागदा भोसले यांचे विरुध्द विविध पोलीस स्टेशनला जबरी चोरी व चोरी करणे असे गंभीर स्वरुपाचे एकुण -04 गुन्हे दाखल आहेत. ते खालील प्रमाणे
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं.
1. गंगापुर, जिल्हा औरंगाबाद 257/2020 भादविक 379
2. श्रीरामपूर शहर 710/2022 भादविक 392, 457, 341, 34
3. श्रीरामपूर तालुका 427/2022 भादविक 394, 380, 457
4. नगर तालुका 766/2022 भादविक 394, 397, 506, 34
आरोपी नामे भोईट्या ऊर्फ डसल्या ऊर्फ आदित्य कांतीलाल काळे यांचे विरुध्द विविध पोलीस स्टेशनला दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, चोरी व अपहरणासह विनयभंग करणे असे गंभीर स्वरुपाचे एकुण -09 गुन्हे दाखल आहेत. ते खालील प्रमाणे
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं.
1. श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर 465/2019 भादविक 363, 354(अ), 143, 147, 148, 149 (फरार)
2. श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर 129/2022 भादविक 457, 380, 511 (फरार)
3. श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर 54/2022 भादविक 457, 380, 511 (फरार)
4. वाळुंज, एमआयडीसी, जिल्हा औरंगाबाद 116/2021 भादविक 379, 34
5. श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर 162/2022 भादविक 379, 34 (फरार)
6. श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर 1831/2020 भादविक 395 (फरार)
7. श्रीरामपूर शहर 710/2022 भादविक 392, 457, 341, 34
8. श्रीरामपूर तालुका 427/2022 भादविक 394, 380, 457
9. नगर तालुका 766/2022 भादविक 394, 397, 506, 34
सदरची कारवाई राकेश ओला. पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्रीमती स्वाती भोर, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर, अतिरीक्त कार्यभार अहमदनगर संदीप मिटके उविपोअ, श्रीरामपूर विभाग व अजित पाटील, उविपोअ, नगर ग्रामिण विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.