शिवप्रहार न्यूज- वेरूळ येथील आश्रमात “शिवप्रहार प्रतिष्ठान”च्या हस्ते पुस्तिका व गणवेशाचे अनावरण संपन्न…
वेरूळ येथील आश्रमात “शिवप्रहार प्रतिष्ठान”च्या हस्ते पुस्तिका व गणवेशाचे अनावरण संपन्न…
वेरुळ-वेरूळ तालुका,रत्नपूर ,जिल्हा संभाजीनगर या ठिकाणी असलेल्या जय बाबाजी भक्त परिवाराच्या मठामध्ये श्री.श्री.१००८,महामंडलेश्वर शांतिगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या धर्मयोद्धा संघ कार्यकर्ता शिबिरामध्ये (तीन दिवसीय शिबिर) दिनांक 26 फेब्रुवारी 2022 रोजी धर्मयोद्धा संघाच्या पुस्तिकेचे व गणवेशाचे उद्घाटन शिवप्रहार प्रतिष्ठान चे प्रमुख सुरजभाई आगे व तहसिलदार श्री.अप्पा सोनावणे यांच्या हस्ते करण्यात आले.
धर्मयोद्धा संघाचे संस्थापक महामंडलेश्वर शांतिगिरी महाराजांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या धर्मयोद्धा कार्यकर्ता शिबीरात नगर,संभाजीनगर, जळगाव,जालना या भागातील तालुका प्रमुख कार्यकर्त्यांना शिवछत्रपतींच्या अठरापगड जातीच्या हिंदुत्वाच्या विचारासंदर्भात मा.पोलीस अधिकारी श्री.सुरजभाई आगे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी जगद्गुरु जनार्दन स्वामी यांचे उत्तराधिकारी,वेरुळ मठाचे प्रमुख तसेच धर्मयोद्धा संघाचे संस्थापक स्वामी श्री.श्री. 1008 महामंडलेश्वर शांतिगिरीजी महाराज यांनी देखील प्रमुख मार्गदर्शन केले.यावेळी मंचावर शांतीगिरीजी महाराजांसह,ब्रह्मचारी नागेश्वरजी महाराज,धर्मयोद्धा संघाचे प्रचारक मेजर पवार,मेजर राऊत,मेजर राजू दादा तसेच योगेश बोराडे,राहुल अस्वले,भाऊराव जगताप,अभिजीत खैरे,गौरव चितळे,संपादक मयूर फिंपाळे यांच्यासह अनेक मावळे उपस्थित होते.