शिवप्रहार न्यूज- गोंडेगाव मध्ये वीज पडून गाय जागीच ठार
गोंडेगाव मध्ये वीज पडून गाय जागीच ठार
श्रीरामपूर - आज सायंकाळी श्रीरामपूर सह आसपासच्या तालुक्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला श्रीरामपूर तालुक्यातील गोंडेगाव येथे सायंकाळी सहाच्या सुमारास शेतकरी भिकाजी भाऊराव थोरात यांच्या गाईवर वीज पडून गाय जागीच ठार झाली शेतकऱ्याच्या झालेल्या नुकसानीमुळे शासनाकडून योग्य मदत मिळावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली काही शेतकऱ्यांना या पावसामुळे नुकसानीला सामोरे जावे लागले असले तरी शेतकऱ्यांमध्ये आजच्या पाऊसामुळे समाधानाचे वातावरण आहे.