शिवप्रहार न्यूज- श्रीरामपुरात ओमिक्रॅानची एन्ट्री;महिलेला झाली लागण…

शिवप्रहार न्यूज- श्रीरामपुरात ओमिक्रॅानची एन्ट्री;महिलेला झाली लागण…

श्रीरामपुरात ओमिक्रॅानची एन्ट्री;महिलेला झाली लागण…

श्रीरामपूर- शहरातील एका व्यावसायिकाची नातेवाईक असलेली ४१ वर्षीय महिला व तिचा सहा वर्षीय मुलगा दि. १५ डिसेंबर रोजी नायजेरियातून श्रीरामपुरात आले होते. त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या संपर्कातील सहा जणांचे नमुने तपासासाठी घेतले होते. या सर्वांचे अहवाल त्यावेळी निगेटिव्ह आले होते. त्यावेळी या सर्वांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती.

     या मायलेकांना शहरातील एका खासगी रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात आले होते. या दरम्यान, सदर मायलेकांचे नमुने ओमायक्रॉनच्या तपासणीसाठी पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल आज येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकार्‍यांना प्राप्त झाला. त्यातील महिलेला ओमायक्रॉनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 

        अद्याप मुलाचा अहवाल आलेला नसून ओमायक्रॉनच्या रुग्णाचे अहवाल जोपर्यंत निगेटिव्ह येत नाही. तोपर्यंत त्यांना विलगीकरणातच ठेवण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश बंड यांनी दिली.