शिवप्रहार न्यूज-शिवप्रहार प्रतिष्ठान च्या आदिवासी-दलित व अठरापगड जातीच्या मावळ्यांनी शिवप्रहारची बदनामी करणाऱ्या धर्मांध लोकांविरुद्ध प्रांताधिकार्‍यांना दिले निवेदन...

शिवप्रहार न्यूज-शिवप्रहार प्रतिष्ठान च्या आदिवासी-दलित व अठरापगड जातीच्या मावळ्यांनी शिवप्रहारची बदनामी करणाऱ्या धर्मांध लोकांविरुद्ध प्रांताधिकार्‍यांना दिले निवेदन...

"शिवप्रहार प्रतिष्ठान"च्या आदिवासी-दलित व अठरापगड जातीच्या मावळ्यांनी शिवप्रहारची बदनामी करणाऱ्या धर्मांध लोकांविरुद्ध प्रांताधिकार्‍यांना दिले निवेदन...

श्रीरामपूर - श्रीरामपूर येथे शिवप्रहार प्रतिष्ठानने रविवारी जो भगवा मेळावा घेतला त्यामुळे अनेक राजकीय मंडळी व हिंदू विरोधी लोकांचे धाबे दणाणले आहे.त्यामुळे काही जेहादी प्रवृत्ती व काही मिशनरी वाले यांना हाताशी धरून राजकारणी लोक हे “शिवप्रहार प्रतिष्ठान” जातीयवादी आहे, अठरापगड जातीचे हिंदुत्व मानत नाही अशी बदनामी निवेदनं देऊन व सोशल मीडियावर करीत आहे.

          याला विरोध म्हणून “शिवप्रहार प्रतिष्ठान” च्या अठरापगड जातीतल्या दलित,आदिवासी,मातंग समाज, बौद्ध समाज,जैन समाज,धनगर समाज,न्हावी समाज,माळी समाज,लोणारी समाज,चर्मकार समाज बांधव,महार समाज,आदिवासी भिल्ल समाज,वडार समाज,वैदू समाज,जैन समाज,कुंभार समाज बांधव,चित्रकथी समाज, मराठा बांधव,तेली समाज ,सोनार समाज बांधव,लोहार समाज बांधव,शिंपी समाज बांधव,उत्तर भारतीय समाज,सुतार समाज बांधव यांच्यासह सर्व अठरा पगड जातीचे हिंदू मावळे यावेळी निवेदन देतांना उपस्थित होते.

श्रीरामपूर चे प्रांताधिकारी श्री.अनिल पवार,तहसिलदार श्री.पाटील व शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी यांना हे निवेदन देण्यात आले.

         या निवेदनात म्हटले आहे की “शिवप्रहार प्रतिष्ठान” नी दलित-आदिवासी अठरापगड जातीच्या हिंदू बांधवांना शिवाजी महाराजांचे अठरापगड जातीचे हिंदुत्वाचे विचार सांगितले.त्यामुळे आम्ही “शिवप्रहार प्रतिष्ठान” सोबत जोडले गेलो आहे. काही जेहादी व मिशनरी वाले यांच्या धर्मस्थळावर कधीही बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होत नाही.अण्णाभाऊ साठे,वस्ताद लहुजी साळवे,वीर एकलव्य यांची जयंती करणे लांबच साध्या शुभेच्छा देखील यांच्या धर्मस्थळामधून येत नाही.त्यामुळे आम्हाला शिवप्रहार मुळे अठरापगड जातीच्या हिंदुत्वाची ओळख झाली.शिवप्रहार प्रतिष्ठानचे हिंदुत्व हे शिवाजी महाराजांचे थेट हिंदुत्व आहे.तेथे जातीव्यवस्था व वर्णव्यवस्था नाही.त्यामुळे पूर्ण दलित-आदिवासी समाज व अठरापगड जातीचे हिंदू “शिवप्रहार प्रतिष्ठान” च्या सोबत आहे.

           “शिवप्रहार प्रतिष्ठान”विरोधात वा प्रमुखांविरोधात काही खोटे गुन्हे दाखल करायला प्रशासनाला भाग पाडले तर दलित-अदिवासींसह सर्व जातीय हिंदू रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.