शिवप्रहार न्यूज- श्रीरामपुरातील विना नंबर प्लेट/डुप्लिकेट नंबर गाड्यांची तपासणी व्हावी…

श्रीरामपुरातील विना नंबर प्लेट/डुप्लिकेट नंबर गाड्यांची तपासणी व्हावी…
श्रीरामपूर- श्रीरामपूर शहरात चेन स्नॅचिंग,छेडछाड,मोबाईल स्नॅचिंगचे प्रकार घडत असुन त्यामागे बिगरनंबर प्लेट/डुप्लिकेट नंबर गाड्यांची भूमिका संशयास्पद असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे.त्या विरोधात आवाज उठवण्यासाठी काही जागरुक नागरिक मागणी करत आहे.
तरी अशा बिगर नंबर प्लेटच्या गाड्यांवर तात्काळ कारवाई व्हावी व काही टू व्हीलरला चुकीचे नंबर टाकून काही समाजकंटक मोटर सायकल वापरत आहे त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हावी तसेच फोर व्हीलर चा नंबर टू व्हीलर ला लावणे असे देखील प्रकार होत असल्याचा दावा एका जागरुक नागरिकाने केला आहे.
श्रीरामपुरात हे प्रकार जास्त प्रमाणात होत आहे यामुळे मुलींची छेड काढणे, गंठण चोरी,मोबाईल चोरी असे प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी विनानंबर प्लेट/डुप्लिकेट नंबर गाड्यांवर लवकर कारवाई करावी अशी मागणी काही मुलींचे पालक व नागरिकांमधुन होत आहे.
दरम्यान श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे व श्रीरामपूर नगरपालीकेच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचे नागरिकांकडुव स्वागत करण्यात येत आहे.