शिवप्रहार न्युज - श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबला फाशीची शिक्षा व्हावी-सकल हिंदू समाजाची मागणी 

शिवप्रहार न्युज - श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबला फाशीची शिक्षा व्हावी-सकल हिंदू समाजाची मागणी 

श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबला फाशीची शिक्षा व्हावी-सकल हिंदू समाजाची मागणी 

नेवासा -वसई येथील श्रद्धा वालकर या हिंदू तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात फसवून आफताब पूनावाला या मुस्लिम तरुणाने तिची दिल्ली येथे नेऊन थंड डोक्याने निर्घृण हत्या केली आणि तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करून मेहरौलीच्या जंगलात फेकले. ज्या पद्धतीने ही हत्या करून अनेक दिवस फ्रिजमध्ये शरीराचे तुकडे ठेवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे, ते बघता हा रागाच्या भरात घडलेला प्रकार नसून ठरवून थंड डोक्याने केलेला त्या दुर्दैवी तरुणीचा आणि त्याद्वारे मानवतेचाच खून आहे.

      या प्रकरणी खुनी आफताबला अटक झालेली असली आणि पोलीस तपास सुरू असला, तरीही या प्रकरणाचा समाज म्हणून सरकारने पूर्ण विचार केला पाहिजे. श्रद्धाचा खुनी आफताब यावर फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवून त्याला आणि या प्रकरणात सहभागी असतील अशा सर्व गुन्हेगारांना फाशीची शिक्षा होणे आवश्यक आहे.

    हा आता केवळ एक अपवादात्मक प्रकार राहिला नसून देशभरात असे हजारो प्रकार नियमितपणे उघडकीस येत आहेत. हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून, त्यासाठी अनेक वेळा स्वतःची ओळख लपवून, हिंदू नाव घेऊन मुस्लिम युवकांकडून होणारा लव्ह जिहादचा प्रकार ही समाजाच्या दृष्टीने अत्यंत धोक्याची गोष्ट आहे. केरळ, दिल्लीसह अनेक ठिकाणच्या न्यायालयांनी यावर चिंता व्यक्त केली आहे. सक्तीचे धर्मांतरण आणि त्याद्वारे निर्माण केले जाणारे लोकसंख्येचे असंतुलन या मुद्द्यांवरून मा. सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा नुकतेच सरकारला प्रश्न विचारले आहेत. मात्र दुर्दैवाने, यापूर्वी घडलेल्या अशाच काही घटनांमध्ये हिंदू समाजातील तक्रारदार व्यक्तींनाच पोलिसांकडून उलट त्रास आणि दबाव सहन करावा लागला आहे. समाजाच्या सांविधानिक वर्तणुकीच्या दृष्टीने ही अतिशय निराशाजनक आणि गंभीर बाब आहे.

     मुस्लिम समाजाकडून होत असणारे हे प्रकार देशातील सामाजिक सलोखा बिघडवणारे आहेत. अशा प्रकारच्या घटना घडण्याचा परिणाम म्हणून स्वाभाविकरीत्या हिंदू समाजाकडूनही काही प्रतिक्रिया येऊ शकतात. हे सर्व टाळण्यासाठी खरे तर मुस्लिम समाजाकडून पुढाकार घेतला जाण्याची आवश्यकता आहे. पण हे होताना दिसत नसल्यामुळे प्रशासन आणि सरकारने अशा प्रकारच्या घटना घडू नयेत, यासाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना करावी.

    सामाजिक सद्भाव आणि कायदा-सुव्यवस्था टिकवणे ही समाजातील सर्वच घटकांची जबाबदारी आहे. यापैकी जर एखाद्याही घटकाने आपली जबाबदारी नीट पार पाडली नाही, तर हा सद्भाव व कायदा-सुव्यवस्था बिघडू शकतात. भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये, यासाठी योग्य ती कार्यवाही आपल्याकडून व्हावी, अशी आम्ही आपल्याकडे तातडीची व आग्रहाची मागणी सकल हिंदू समाज,नेवासा करत आहोत.