शिवप्रहार न्यूज- सुदृढ व निरोगी आरोग्यासाठी सूर्यनमस्कार उपयुक्त - प्राचार्या स्वाती खर्डे…

शिवप्रहार न्यूज- सुदृढ व निरोगी आरोग्यासाठी सूर्यनमस्कार उपयुक्त - प्राचार्या स्वाती खर्डे…

सुदृढ व निरोगी आरोग्यासाठी सूर्यनमस्कार उपयुक्त - प्राचार्या स्वाती खर्डे…

लोणी ( वार्ताहर ) - येथील डॉ विखे पाटील फाउंडेशन ,पुणे संचलित सर्वांगीण शिक्षण व गुणवत्तापूर्ण शिक्षणास तालुक्यात अग्रेसर असलेली लिट्ल फ्लॉवर स्कूलमध्ये विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्वपूर्ण दिवस मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. 12 फेब्रुवारी हा दिवस जागतिक सूर्यनमस्कार दिन म्हणून संपूर्ण विश्वामध्ये साजरा केला जात असतो . आयुर्वेदामध्ये योग व योगाचा भाग असलेल्या सूर्यनमस्कार अनन्य साधारण महत्व आहे .सूर्यनमस्कार हे निरोगी व सुदृढ आरोग्यास खूपच उपयुक्त असल्याचे प्रतिपादन आदर्श प्राचार्या स्वाती खर्डे यांनी केले . 

             यावेळी प्राचार्या खर्डे म्हणाल्या की, दरवर्षी रथसप्तमीला सूर्यनमस्कार सामूहिकरीत्या किंवा वैयक्तिक घेतले जातात खरे तर या दिवसाचे औचित्य साधून सर्वांनी पूर्ण हिवाळ्यामध्ये नियमितपणे सूर्यनमस्कार करावेत थंडीमध्ये सूर्य दारी मिळणारी उष्णता ऊर्जा शरीराला लाभदायक आहे सूर्यनमस्कार ही आसनांची एक मालिका आहे ज्या द्वारे शरीरातील प्रत्येक भागाला व्यायाम मिळतो . हाताचे मनगट ,कोपरे, खांदे ,पाठीचा कणा ,गुडघे ,पायाचे घोटे अशा सर्व सांध्यांना सूर्यनमस्कारामुळे फायदा होतो . शरीर पिळदार होऊन त्याची चपळता व स्फूर्ती वाढते . तेजस्वी शरीर संवर्धनासाठी सूर्यनमस्कार उपयुक्त आहेत . विद्यार्थ्यांनी नियमितपणे सूर्यनमस्कार करावे असे आवाहन प्राचार्या खर्डे यांनी केले. 

       सदर कार्यक्रम हा ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने सादर करण्यात आला . शासनाने ठरवून दिलेल्या कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन करून शाळेत इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी भव्य क्रीडांगण आवर्ती सूर्यनमस्कार केले ऑनलाईन पद्धती द्वारे इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी घरी आपल्या पालकांसमवेत सूर्यनमस्कार केले . शाळेच्या प्रत्येक कार्यक्रमात मोठ्या उत्साहाने सहभागी होणारे पालक वर्ग देखील या कार्यक्रमात उपस्थिती दर्शवून सूर्यनमस्कार केले . ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने आयोजित या कार्यक्रमास एक हजार विद्यार्थ्यांनाबरोबर हजारो पालकांनी आपला सहभाग नोंदविला . 

          संस्थेचे विद्यमान चेअरमन डॉअशोक पाटील विखे,सचिव नंदिनी विखे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली व शाळेच्या प्राचार्या सौ स्वाती खर्डे यांच्या नेतृत्वाखाली शाळेतील विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्य केले .