शिवप्रहार न्यूज-श्रीरामपूर शहरात सकाळी उसाचा ट्रक पलटी;ऊस रिक्षावर कोसळला…

शिवप्रहार न्यूज-श्रीरामपूर शहरात सकाळी उसाचा ट्रक पलटी;ऊस रिक्षावर कोसळला…

श्रीरामपूर शहरात सकाळी उसाचा ट्रक पलटी;ऊस रिक्षावर कोसळला…

श्रीरामपूर -श्रीरामपूर शहरातील संगमनेर रोडवर असणाऱ्या एचडीएफसी बँक समोर नेवासारोड कडून बाबळेश्वर कडे जाणारा ऊसाने भरलेला ट्रक क्रमांक एम एच 15 सीके 6248 हा ट्रक टायर फुटल्यामुळे पलटी झाला.

       आज गुरुवार दिनांक ३१ मार्च २०२२ रोजी सकाळी सव्वा अकरा वाजताच्या सुमारास ही घटना घडली.उसाचा ट्रक पलटी झाल्यामुळे त्यातील ऊस कुटी शेजारी असलेल्या रिक्षावर पडली.त्यामुळे रिक्षाचे देखील काही प्रमाणात नुकसान झाले.

        सुदैवाने यामध्ये कुठल्याही व्यक्तीला बाधा झाली नाही.स्थानिक नागरिकांनी याबाबत प्रशासनाला कळविले असून प्रशासन ट्रक हटवण्यासाठी पुढील हालचाल करीत आहेत.