शिवप्रहार न्यूज- विद्यार्थीनीला रिक्षात बसवून बुरखा घालून,शेतात नेऊन विनयभंग;वार्ड नंबर ०२ मधील आरोपी विरोधात ॲट्रॉसिटीसह पोक्सोचा गुन्हा दाखल...

विद्यार्थीनीला रिक्षात बसवून बुरखा घालून,शेतात नेऊन विनयभंग;वार्ड नंबर ०२ मधील आरोपी विरोधात ॲट्रॉसिटीसह पोक्सोचा गुन्हा दाखल...
श्रीरामपूर -श्रीरामपूर शहर परिसरातील एका १७ वर्षीय बारावीला शिक्षण घेणाऱ्या हिंदू विद्यार्थिनीला कॉलेज जवळील रेवेन्यू कॉलनी समोरून रिक्षामध्ये बसवून,तिला बुरखा घालायला लावून,त्यानंतर रिक्षाने बेलापूर परिसरातील शेतात नेऊन तिचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे.काल गुरुवार दि.०७ डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे.
याप्रकरणी शहर पोलिसांनी गंभीर दखल घेत शहा नावाच्या आरोपी विरोधात,राहणार- वार्ड नंबर 2, श्रीरामपूर विनयभंगासह,पोक्सो व ॲट्रॉसिटी कायद्यातील कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.श्रीरामपूर शहर परिसरातील एका हिंदू अल्पवयीन मुलीसोबत तिला बुरखा घालायला लावून, रिक्षात बसवून,शेतात नेऊन तिचा विनयभंग करण्याचा प्रकार घडल्यामुळे हिंदू समाजाकडून संतापाची भावना व्यक्त होत आहे.
श्रीरामपूर शहरातील जय श्रीराम तालीम संघ व “शिवप्रहार प्रतिष्ठान”च्या मावळ्यांनी पीडित मुलगी व तिच्या आईला या गंभीर प्रकारामध्ये संपूर्ण सहकार्य केले.