शिवप्रहार न्यूज- पुण्यातील साईभक्ताने साईबाबांच्या चरणी केले ५००० किलो आंबे अर्पण…

शिवप्रहार न्यूज- पुण्यातील साईभक्ताने साईबाबांच्या चरणी केले ५००० किलो आंबे अर्पण…

पुण्यातील साईभक्ताने साईबाबांच्या चरणी केले ५००० किलो आंबे अर्पण…

शिर्डी -

       पुणे जिल्‍ह्यातील शिरुर येथील शेतकरी साईभक्‍त दिपक नारायण करगळ यांनी सेंद्रीय पध्‍दतीने पिकविलेले ५००० किलो केशर आंबे श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या श्री साईप्रसादालयात देणगी स्‍वरुपात दिले असल्‍याची माहिती संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांनी दिली.

           श्रीमती बानायत म्‍हणाल्‍या, साईभक्‍त दिपक करगळ यांची स्‍वताःची मालकीची केशर आंब्यांची आमराई असून सदरचे केशर आंबे हे रासायनिक प्रक्रिया न करता पिकविलेले आहे. हे आंबे नैसर्गिकरित्‍या पिकविलेले व उच्‍च प्रतीचे आहे. गेल्‍या दोन ते तीन वर्षापासुन साईभक्‍त श्री.करगळ हे केशर आंबे संस्‍थानला देणगी स्‍वरुपात देत आहे. यावर्षी सुमारे ०४ लाख २५ हजार रुपये किंमतीचे ५००० किलो केशर आंबे देणगी स्‍वरुपात संस्‍थानच्‍या श्री साईप्रसादालयात दिलेले आहे. दोन दिवस या आंब्‍यांच्‍या रसाचे प्रसाद भोजन साईभक्‍तांना, दोन्‍ही रुग्‍णालय येथील रुग्‍णांना तसेच अनाथाश्रम, वृध्‍दाश्रम आदी ठिकाणी देण्‍यात येणार असल्‍याचे ही श्रीमती बानायत यांनी सांगितले.