शिवप्रहार न्युज - टाकळीभानजवळ अपघातात ०३ ठार…
टाकळीभानजवळ अपघातात ०३ ठार…
टाकळीभान/प्रतिनिधी- आज मंगळवार दि.२१ जानेवारी रोजी नेवासा फाट्यावर लग्न लावून टाकळीभान येथे येणाऱ्या वऱ्हाडाच्या गाडीला टाकळीभान इरिगेशन बंगल्याजवळ मोटरसायकलवाला आडवा आल्याने, त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात वऱ्हाडाची गाडी झाडावर आदळुन झालेल्या भीषण अपघातात ०३ जण मृत्यू पावले आहे.त्यात लहान मुलीचा समावेश असुन तर ०७ जण जखमी आहे.त्यात काहींची प्रकृती गंभीर असून उपचारासाठी श्रीरामपूर व अहिल्यानगर येथे पाठवण्यात आले आहे.जखमी पैकी सात जखमी टाकळीभान येथील एका फॅमिलीतली वऱ्हाडी मंडळी आहे असे समजते.