शिवप्रहार न्युज - श्रीरामपुरात RBNB कॉलेजजवळ तरूणाच्या मर्डरचा प्रयत्न; गोळीबाराचीही चर्चा...

शिवप्रहार न्युज - श्रीरामपुरात RBNB कॉलेजजवळ तरूणाच्या मर्डरचा प्रयत्न; गोळीबाराचीही चर्चा...

श्रीरामपुरात RBNB कॉलेजजवळ तरूणाच्या मर्डरचा प्रयत्न; गोळीबाराचीही चर्चा...

  श्रीरामपूर (शिवप्रहार न्यूज)- श्रीरामपूर शहरातील RBNB कॉलेजजवळील गायकवाड शाळेच्या पाठीमागील कृष्णविहार परिसरात आज दि.२१ जानेवारी रोजी दुपारी शाहरुख आयुब पठाण या तरुणावर चॉपरने वार करून त्याच्या खूनाचा प्रयत्न करण्यात आला आहे. यावेळी गोळीबार करण्यात आल्याचेही बोलले जात आहे. शाहरुखच्या डोक्यात, छातीवर, पाठीवर चॉपरने वार करण्यात आल्याचे समजते. त्याला सुरूवातीला शहरातील साखर कामगार रूग्णालयात दाखल करण्यात आले होते तेथून त्याला लोणीला प्रवरा रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे डॉ. रवींद्र जगधने यांनी सांगितले.

     शाहरुख आयुब पठाण हा श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर - ०२ मधील हुसेननगर भागात राहत असल्याचे समजत असून त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान शाहरूखच्या खूनाचा प्रयत्न कोणी केला आणि कोणत्या कारणामुळे केला ? याबाबत पुढील तपास पोलिस करत आहे.