शिवप्रहार न्यूज- शिवप्रहार चा “शंभू मेळावा-०१”वैजापूर येथे बुलंदपणे संपन्न…
शिवप्रहार चा “शंभू मेळावा-०१”वैजापूर येथे बुलंदपणे संपन्न…
वैजापूर- शिवप्रहार प्रतिष्ठान व शिवशंभूभक्त परिवार यांच्यावतीने संभाजीनगर नामकरण मोहिमेअंतर्गत आयोजित केलेला “शंभू मेळावा-०१” हा कार्यक्रम वैजापूर शहरातील द्रौपदी लॉन्स येथे काल दिनांक 9 एप्रिल 2022 रोजी संपन्न झाला.या कार्यक्रमाला वैजापूर तालुक्यातील अठरापगड जातीचे चार ते पाच हजार शिवशंभू मावळे उपस्थित होते.
यावेळी शिवप्रहार प्रतिष्ठानचे प्रमुख मा.पोलीस अधिकारी सुरजभाई आगे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की,संभाजीनगर नामकरण कायदेशीर करायचे असेल तर लोकशाही मार्गाने कुठलाही कायदा हातात न घेता असेच सर्व तालुक्यामध्ये कार्य करावे लागेल.तेव्हाच सर्व सरकारी कार्यालयात, सरकारी कागदपत्रांवर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे नाव मोठ्या दिमाखात झळकले जाईल. तसेच आपण औरंगजेब या क्रूर शासकाचं नाव हटवत आहोत राष्ट्रभक्त एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव हटवण्यासाठी ही मोहीम आपण काढलेली नाही. शंभूराजांना हाल हाल करून मारणाऱ्या मारेकरी औरंगजेबाचे नाव हटवण्यासाठी बिगर राजकीय व लोकशाही मार्गाने चालू केलेली ही मोहीम आहे.आजपर्यंत संभाजीनगर नामकरणसाठी फक्त मीडिया बाजी झाली ,पेपर बाजी झाली,बॅनरबाजी झाली परंतु संभाजीनगर नाव व्हावे यासाठी लोकचळवळ कोणी उभी केली नाही ते काम शिवप्रहार प्रतिष्ठान च्या वतीने चालू झाले आहे.संभाजीनगर नामकरण मोहिमेचे पुढचे असेच बुलंद पाऊल शंभू मेळावा-०२ च्या रूपाने पडणार असून 12 जून 2022 मध्ये हा कार्यक्रम संभाजीनगर शहराजवळ आयोजित केला जाईल.वैजापूर तालुक्याच्या सारखा इतरही तालुक्यातला अठरा पगड जातीचा शिवशंभूभक्त-मावळा जागा झाला तर अवघ्या महाराष्ट्राचे स्वप्न असलेले औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर हे लवकरच पूर्णत्वास आलेले दिसेल.
वैजापूर तालुक्या पुरत्या मर्यादित असलेल्या “शंभू मेळावा-०१”या कार्यक्रमाला वैजापूरचे आमदार रमेश बोरणारे सर,वैजापूरचे नगराध्यक्ष दिनेशभाऊ परदेशी,नगरसेवक गणेश खैरे,नगरसेवक बजरंग मगर,नगरसेवक शैलेश चव्हाण,गटनेते नगरसेवक दशरथ बनकर,नगरसेवक गोकुळ भुजबळ,नगरसेवक
दिनेश राजपुत,सागर राजपुत,गौरव दोडे ,अयोध्या सोशल फाउंडेशन तसेच सर्व पक्षीय पदाधिकारी यांच्यासह वेगवेगळ्या पक्षाचे व वेगवेगळ्या संघटनांचे शिवशंभूभक्त देखील उपस्थित होते.
या संभाजीनगर नामकरण मोहिम यशस्वी व्हावी यासाठी “शिवप्रहार प्रतिष्ठान”चे अठरापगड जातीचे मावळे प्रचंड परिश्रम करुन मेहनत घेत आहेत.जोपर्यंत संभाजीनगर कायदेशीर होत नाही तोपर्यंत शिवप्रहार लोकशाही मार्गाने लढत राहील.