शिवप्रहार न्युज - गोवंशांची कत्तलीपासून सुटका;श्रीरामपूर शहर पोलीसांची कारवाई…

शिवप्रहार न्युज - गोवंशांची कत्तलीपासून सुटका;श्रीरामपूर शहर पोलीसांची कारवाई…

गोवंशांची कत्तलीपासून सुटका;श्रीरामपूर शहर पोलीसांची कारवाई…

श्रीरामपूर- दिनांक 05/05/2023 रोजी रात्री 21/50 वा. सुमारास पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांना गुप्तबातमीदारामार्फत बातमी मिळाली की, धनगरवस्ती, वार्ड नं. 2, श्रीरामपूर येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये गोवंशीय जातीचे लहान 08 जर्सी गोऱ्हे हे कत्तल करण्याच्या उददेशाने बांधुन ठेवली आहेत. आत्ता गेल्यास ते मिळुन येतील अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी बिट अंमलदार व तपास पथकास नमुद ठिकाणी जावुन कारवाई करण्याचे तोंडी आदेश दिल्याने, तपास पथक व बिट अंमलदार तात्काळ धनगरवस्ती, वार्ड नं. 2, श्रीरामपूर येथील एका पत्र्याच्या शेड येथे जावुन छापा टाकला असता सदर ठिकाणी गोवंशीय जातीचे काळया, पांढऱ्या, तांबडया, रंगाचे 08 लहान जर्सी गोहे प्रत्येकी 4000/- रू. किं. अंदाजे, असा एकुण 40000/- रु. किंमतीचे जर्सी गोऱ्हे एका पत्र्याच्या शेड मध्ये त्यांची कोणतीही चारा पाण्याची व्यवस्था न करता गर्दी करुन त्यांना निर्दयतेने कत्तल करण्याच्या उददेशाने बांधुन ठेवलेली मिळुन आले. 

       तेव्हा जनावराबाबत आजुबाजुला चौकशी केली असता सदरचे जनावरे हे हारुण गणी कुरेशी रा. कुरेशी मौहल्ला, वार्ड नं. 02 श्रीरामपुर यांने आणल्याचे समजले. म्हणुन हारुण गणी कुरेशी, याचे विरुध्द श्रीरामपूर शहर पो.स्टे. गुन्हा रजि. क्र. 430 /2023 महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1995 चे सुधारित कायदा सन 2015 चे कलम 5, 5 (ब), 9 (अ) सह पाण्यांना क्रुतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधि. 1960 चे कलम 11, च, ज, छ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

       सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेब, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर स्वाती भोर तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर, संदिप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस निरीक्षक, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन, हर्षवर्धन गवळी, यांचेकडील तपास पथकातील, पोहेकॉ/ शफिक शेख, पोना/ भैरवनाथ अडागळे, पोना/ अमोल जाधव, पोना / रघुवीर कारखेले, पोकॉ/ राहुल नरवडे, पोकॉ/ गौतम लगड, पोकॉ/आजिनाथ आधळे पोकॉ/शिवाजी बडे, पोकॉ/ संभाजी खरात यांनी केली असुन दाखल गुन्हयाचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी साो यांचे मार्गदर्शनाखाली पोना/ अमोल जाधव हे करीत आहेत.