शिवप्रहार न्यूज- श्रीराम नवमी यात्रेनिमित्ताने श्रीराम मंदिरात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर श्री.ज्ञानेश्वरी पारायण सुरू!
श्रीराम नवमी यात्रेनिमित्ताने श्रीराम मंदिरात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर श्री.ज्ञानेश्वरी पारायण सुरू!
श्रीरामपूर (शिवप्रहार न्यूज)- श्रीरामपूर शहरात सालाबाद प्रमाणे श्रीराम नवमी यात्रा उत्सवाची तयारी जोरात सुरू झाली असून श्रीराम मंदिर ट्रस्ट च्या वतीने श्री रामनवमी जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज बुधवारी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मोठ्या उत्साहात धार्मिक वातावरणात सुरू झाला. वाचक भाविकांनी मोठी गर्दी केल्याने मंदिरातील परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला आहे.
आज बुधवार दिनांक 22 मार्च ते 30 मार्च दरम्यान हा श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा होणार असून व्यासपीठ चालक ह.भ.प.संतोष महाराज पाठारे हे श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायण वाचन करीत आहे. दररोज ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वाचन, हरिपाठ, काकडा भजन सायंकाळी सात वाजता श्रींची महाआरती होणार आहे. श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा उत्साहात सुरू झाला असून श्री राम मंदिर ट्रस्टच्या वतीने श्रीराम नवमी यात्रा उत्सव व श्री राम जन्मोत्सवाची जोरदार तयारी करण्यात येत आहे. सर्व पदाधिकारी यासाठी परिश्रम घेत आहे. आज गुढीपाडव्याच्या हिंन्दु नववर्षा निमित्त प्रभु श्रीराम, सितामाई, लक्षणजी, पवनपुत्र हनुमान यांच्या मुर्तीना गाढी-कडया सह अकर्षक सजावट करण्यात आली आहे. मंदिराचे मुख्य पुजारी वाडेकर महाराज यांनी ही सजावट केली. तसेच श्रीराम मंदिरावर भगवी गुढी ऊभरण्यात आली. भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.