शिवप्रहार न्युज - पठाण चित्रपटास हिंदू संघटनेचा विरोध…
पठाण चित्रपटास हिंदू संघटनेचा विरोध…
श्रीरामपूर येथील- भगवाधरी ग्रुप, व छत्रपती शिवाजी महाराज चौक प्रतिष्ठानच्या वतीने येत्या 25 जानेवारी 2023 रोजी बॉलीवूडच्या 'पठाण' चित्रपटात हिंदू धर्माच्या व समस्त हिंदू समाजाच्या जाणून-बुजून अपमान करण्याचा हेतूने काही चित्रीकरण करण्यात आले आहे .
बॉलीवूडचा हिंदू समाजाच्या भावना दुखावण्याचा प्रदीर्घ इतिहास आहे परंतु हिंदू समाज येथून पुढे हिंदू धर्माच्या कोणत्याही प्रकारच्या अपमान व हीन वागणूक अशा समाज कंटकांकडून सहन करणार नाही.सदर चित्रपट प्रदर्शित झाल्यास हिंदू समाजाच्या भावना दुखावुन त्यातून हिंदू जन माणसाचा उद्रेक होणे निश्चित व अपरिहार्य आहे.
तरी सदर पठाण चित्रपट आपल्या चित्रपटात प्रदर्शित करणे टाळावे अशा प्रकारचे निवेदन किशोर चित्रपट ग्रुहाचे व्यवस्थापक कृणाल बोरावके व श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्री.गवळी यांना भगवाधारी ग्रुप व छत्रपती शिवाजी महाराज चौक प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आले.निवेदनावर
सचिन बाकलिवाल, विशाल अंभोरे, सूरज यादव, करण मापरी,अड राजेश्वर भारस्कर ,मनोज शिकरे ,शक्तिसिंग सिंग ,रोहन चावरिया ,निखिल रिल ,रोहन दिवे,विजय खेडकर,गणेश यमे ,पंकज ललवाणी,किरण जगताप पप्पू चौधरी,आकाश म्हसे ,करण लोंढे आदी यांच्या सही होत्या .